Home » चाणक्याच्या नीतीशास्त्रातील ‘हे’ उपाय केले तर होईल नोकरीमध्ये भरभराट!
Article Infomatic

चाणक्याच्या नीतीशास्त्रातील ‘हे’ उपाय केले तर होईल नोकरीमध्ये भरभराट!

आचार्य चाणक्य हे एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ,रणनीति कार व नीतीशास्त्र विद्वान होते. मनुष्य जीवनाशी निगडित विविध अंगांचे चाणक्य यांना अगदी सखोल ज्ञान होते. म्हणूनच त्यांनी या सर्व अंगांवर प्रकाश टाकणारे एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव नीतिशास्त्र असे होते. मनुष्याच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंचे या पुस्तकात अगदी विस्तृतपणे विश्लेषण करण्यात आले आहे.

नितीशास्त्र मध्ये धर्म, व्यापार ,नोकरी ,विवाह ,पती-पत्नी ,करियर यांसारख्या विविध विषयांवर विवेचन करण्यात आले आहे .नीतिशास्त्र मध्ये एका ठिकाणी आपले करिअर किंवा उदरनिर्वाहासाठी च्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी कोणते उपाय अवलंबवावेत याविषयीचे विश्लेषण करण्यात आले आहे.नीती शास्त्रानुसार आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणते उपाय अवलंबवावेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आचार्य चाणक्याच्या मते कोणतेही काम करताना मनुष्यामध्ये प्रामाणिकपणा व शिस्त असणे खूप आवश्यक आहे. जी व्यक्ती शिस्तबद्ध आणि प्रामाणिक पणा आपल्या अंगी ठेवत नाही ते कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.

चाणक्याच्या मते जी व्यक्ती इतरांशी कपटीपणाने वागते ती कधीही पुढे जाऊ शकत  नाही. आपण दिलेले शब्द पाळणे हे यशस्वी होण्यासाठी खूप आवश्यक असते.

जोखीम घेणे -कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी जोखीम घ्यावी लागते. जी व्यक्ती कोणत्याही प्रकारची जोखीम घेत आहे तिला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे चाणक्यने आपल्या नीतिशास्त्र मध्ये सांगितले आहे.

कोणतीही व्यक्ती ही एकट्याने यशस्वी होऊ शकत नाही. तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या लोकांसोबत जुळवून घेऊन सगळ्यांसोबत पुढे जाणे हे अगदी सहज व सोपे असते. जी व्यक्ती एकट्याने लढा देते तिला संघर्षही अधिक करावा लागतो.

सामर्थ्य ओळखणे- कोणत्याही नोकरी किंवा व्यवसायामध्ये जाण्याअगोदर व्यक्तीने आपल्या क्षमता व सामर्थ्य आणि बलस्थान यांना ओळखणे गरजेचे असते. जर आपल्या क्षमता विषयी अवास्तव अपेक्षा असतील तर त्यामुळे भविष्यामध्ये नुकसानच अधिक होऊ शकते.