Home » पंजाबराव डख चालते फिरते हवामान खाते, जाणून घ्या त्याच्या विषयी माहिती नसलेल्या काही गोष्टी
Infomatic

पंजाबराव डख चालते फिरते हवामान खाते, जाणून घ्या त्याच्या विषयी माहिती नसलेल्या काही गोष्टी

भारत हे कृषिप्रधान अर्थव्यवस्था आहे. भारताचा पाया हाच शेती आधारित आहे. बळीराजा जगला तरच सगळी जनता जगेल हे तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र यामध्ये बळीराजा सध्या खूपच संकटांमध्ये आहे हे एक दुःखी करणारे वास्तव आहे. कर्जबाजारीपणा निसर्गाची अवकृपा,सरकारी अनास्था यामुळे शेतकरी मोठ्या दुष्टचक्रात सापडला आहे. सध्या गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने दिलेली हुलकावणी हा एक शेतीव्यवसायाला बसलेला फार मोठा फटका आहे.

हवामान खाते व वेधशाळा यांनी नोंदवलेले अंदाज बहुतांश वेळा चुकीचे ठरतात व यामुळे नुकसान हे शेतकऱ्याचे होते.अनेकदा काढणीला आलेली पिके अतिवृष्टीमुळे तशीच सडून जातात व परिणामी शेतकऱ्यांचे श्रम व कष्ट माती मोल होऊन जातात. या निराशाजनक वातावरणात काही प्रयोगशील शेतकरी व शेती व्यवसायाविषयी खरी आस्था व धडपड असणारे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पंजाबराव डख होय.

पंजाबराव डख हे विदर्भातील एका खेड्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत व आतापर्यंत त्यांनी हवामान विषयक व पावसा विषयक नोंदवलेले अंदाज हे तंतोतंत खरे ठरले आहेत व याचा फायदा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून पेरणीपासून ते काढणीपर्यंत अगदी टप्प्याटप्प्याने संबंधित शेतकऱ्यांना झालेला आहे . पंजाबराव डंख हे नक्की काय काम करतात हे आपण जाणून घेणार आहोत यातून त्यांच्या कार्याची महती आपल्याला कळेल.

पंजाबराव डख हे 1990 सालापासून आपल्या कुटुंबासोबत शेती करतात.सुरुवातीपासूनच शेतीविषयी पंजाबराव डख यांना आवड आहे व भारतीय शेती आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी प्रयोगशील पणा असणे आवश्यक आहे हे त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे .1990 च्या काळामध्ये बातम्यांमध्ये हवामान विषयक अंदाज सांगितले त्यावेळी त्यांना या हवामान विषयक अंदाज विषयी कमालीची उत्सुकता वाटत असे व जवळपास 42 हजार जिल्ह्यांमध्ये नक्की कोणत्या वेळी कुठे कसे हवामान असेल हे अचूकपणे कसे सांगता येऊ शकते हा प्रश्न सुद्धा त्यांना पडत असे व यामधूनच त्यांनी ही डॅकचा हवामान विषयक अभ्यासक्रम पूर्ण केला.

या विषयावर 1990 सालापासून त्यांनी खूप सारी निरीक्षण केली यामध्ये नैसर्गिक परिस्थिती व  काही शास्त्रीय तथ्यही त्यांनी वेळोवेळी आपल्या जवळ लिखित स्वरूपात नोंद करून ठेवले आहेत व या सर्व अभ्यासाच्या आधारे त्यांनी साधारणपणे पाऊस कधी येऊ शकतो व पेरणी किंवा काढणी करण्याची योग्य वेळ कोणती असू शकते याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले. सुरुवातीच्या काळामध्ये साध्या मोबाईल फोनवर त्यांनी आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना मेसेज करून हवामान विषयक माहिती देणे सुरू केले. मात्र काही काळानंतर जेव्हा मोबाईल फोन मध्ये खूप प्रगत तंत्रज्ञान आले तेव्हा व्हाट्सअप वर त्यांनी 36 जिल्ह्याचे वेगवेगळे असे ग्रुप स्थापन केले व प्रत्येक जिल्ह्यानुसार ते हवामान विषयक अंदाज अगदी अचूक वेळी आपल्या संदेश यांमधून पोचवत असतात व यामधून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळते.

 पंजाबराव डंख यांचे हवामानविषयक अंदाज आज पर्यंत कधीही चुकले नाहीत.  आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींचा आधार सुद्धा ते पावसाविषयी अंदाज वर्तवण्यासाठी करतात. म्हणजे जसे की पाऊस येण्याअगोदर घरातील लाईट वर पाकोळ्यांचे प्रमाण वाढते त्या परिस्थितीमध्ये साधारण 72 तासांमध्ये पाऊस येण्याचा अंदाज वर्तवतात .तसेच वारा थांबल्यावर ही पाऊस येण्याची चिन्हे निर्माण होतात असे त्यांचे म्हणणे आहे.

जेव्हा जून मध्ये पेरणी करण्याची वेळ येते तेव्हा शेतकरी नेहमीच आकाशाकडे डोळे लावून बसलेला दिसतो पण यावरही त्यांनी अतिशय उत्तम असे विश्लेषण शेतकऱ्यांसाठी केलेले आहे. त्यांच्या मते साधारण 12 जुलै ते 15 जुलै या दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला असतो त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नसते.

पंजाबराव यांनी  वर्तवलेल्या अचूक अंदाजमुळे अनेक लोक त्यांच्याकडे  दैवी शक्ती असल्याचे म्हणतात. मात्र स्वतः पंजाबरावांनी यामागे शास्त्रीय आधार व नैसर्गिक निरीक्षणे असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याच्या अंदाजा मध्ये अधिक शास्त्रीय दृष्ट्या संशोधन होणे खूप आवश्यक आहे हेच पंजाबराव यांच्या महत्वपूर्ण कार्य मधून दिसून येते.