Home » ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘शेषाचलम’ जंगलाविषयी थक्क करणाऱ्या काही गोष्टी…!
Infomatic

‘पुष्पा’ चित्रपटातील ‘शेषाचलम’ जंगलाविषयी थक्क करणाऱ्या काही गोष्टी…!

नुकताच प्रदर्शित झालेला  पुष्पा द राईज या चित्रपटाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटामध्ये दक्षिण भारतातील एका जंगलामध्ये कशा प्रकारे रक्त चंदनाच्या तस्करीचा व्यवसाय केला जातो व हे रक्तचंदन कशाप्रकारे विकले जाते हे दाखवण्यात आले आहे.

प्रत्यक्षात हे जंगल अस्तित्वात आहे व या जंगलामध्ये रक्त चंदनाच्या तस्करीचा जो व्यवसाय चालतो त्याला कारण म्हणजे रक्तचंदनाला मिळणारी कोट्यावधींचे मुल्य होय.रक्तचंदनाला इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे की या ठिकाणी तस्करी रोखण्यासाठी स्पेशल कमांडो फोर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.या जंगलाविषयी व रक्तचंदन या विषयीचे काही तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.

१) या जंगलाचे नाव शेषाचलम जंगल आहे.हे जंगल शेषाचलम डोंगर रांगांमधील पाच लाख हेक्टर इतके परिसरामध्ये पसरलेले आहे.हे जंगल रक्त चंदनासाठी  ओळखले जाते. रक्तचंदन हे कर्नाटकामधील चित्तोर,नेल्लूर व कडप्पा या तीन जिल्ह्यांमध्ये आढळून येते. रक्तचंदन भारतामधील काही विशिष्ट ठिकाणी आढळून येते व ते या जंगलामध्ये प्रामुख्याने आढळते. रक्तचंदन पासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात व त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहे म्हणूनच बाहेरच्या देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या तस्करीच्या मार्गाने रक्तचंदन बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केले जाते.

२) रक्तचंदनाचे प्रमाण सध्या खूप कमी होत आहे.यामुळे रक्त चंदनाची तस्करी करणाऱ्या लोकांची नजर ही शेषाचलमच्या जंगलावर आहे.या जंगलामधून तस्करांचा निश्चितच मोठा फायदा होतो‌ सध्या या जंगलामधून रक्त चंदनाच्या तोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे व रक्तचंदन हे आंध्र प्रदेश च्या बाहेर देण्यासही मज्जाव करण्यात आलेला आहे.

३) काही वर्षांपूर्वी या शेषाचलमच्या जंगलातून रक्त चंदनाची तस्करी केली असता बाराशे टक्के इतका नफा मिळत होतो यामुळे दरवर्षी तस्कर आपला जीव धोक्यात घालून तब्बल दोन हजार टन इतके चंदनाची तस्करी करत असत.मुंबई,तूतीकोरिन, कलकत्ता या बंदरा द्वारे नेपाळ ते तिबेटमार्गे चीनमध्ये रक्तचंदनाची तस्करी केली जात असे.रक्त चंदनाची तस्करी करताना मिठाच्या लाद्या सरसोच्या पेंड्या व अन्य काही वस्तूंच्या मध्ये रक्तचंदन लपून ते पुरवले जात असे. ही तस्करी रोखण्यासाठी 2015 साली अनेक चंदन तस्करांना पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार सुदधा केले गेले.सध्या रक्त चंदनाची तस्करी करताना पकडले गेले तर अकरा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

४) इतक्या प्रमाणात जीवाचे धोके घेऊन तस्करी केले जाणारे रक्तचंदन सजावटीच्या वस्तु , फर्निचर आणि पारंपरिक वाद्यांची निर्मिती करण्यासाठी वापरले जाते.जपानमध्ये तर एका पारंपारिक वाद्य साठी रक्त चंदनाच्या लाकडाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. घरामधील लाकडी डबे ,खेळणी इत्यादी बनवण्यासाठी ही रक्तचंदनाचा वापर केला जातो.तसेच चेहऱ्याला लावायचे क्रीम, सौंदर्यप्रसाधने ,अत्तर,औषधी लेप ,कामोत्तेजक  औषधे इत्यादींच्या निर्मितीसाठी सुद्धा या चंदनाची खूप मोठी मागणी सिंगापूर दुबई चीन व जपानमध्ये केली जाते. सर्वात जास्त रक्तचंदन हे चीनमधून मागणी केले जाते.

५) जपानमध्ये तर रक्तचंदनाचे खूपच महत्त्व आहे .जपान मध्ये शामीसेन हे पारंपरिक वाद्य बनवण्यासाठी रक्तचंदनाचा वापर केला जातो व यासाठी भारताकडून खूप मोठ्या प्रमाणात जपानमध्ये चंदनाची आयात केली जाते .लग्नाच्या प्रसंगी हे वाद्य भेट म्हणून दिले जाते. रक्तचंदन यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आहेत त्यापैकी एक गुणधर्म म्हणजे अणू प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या किरणांना शोषून घेण्याचा गुणधर्मही रक्तचंदनमध्ये आहे.