Home » बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यातील नाते…
Infomatic

बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यातील नाते…

भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.लता मंगेशकर यांना कोविडची सौम्य लक्षणे व न्युमोनिया चा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते.जवळपास गेल्या 28 दिवसांपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या.28 जानेवारीला त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरुन हलवण्यात आले होते मात्र पाच फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावत गेली व यातच त्यांचे आज निधन झाले.

लता मंगेशकर यांच्या जाण्याने संगीत विश्वामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजकारण, कला क्षेत्र,क्रीडा क्षेत्र,समाजकारण या विविध क्षेत्रांमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.लतादीदी यांचे नाते हे या सर्व क्षेत्रातील व्यक्तींसोबत अतिशय मोकळेपणाचे होते.त्यांच्या आवाजाचे अनेक दिग्गज लोक चाहते होते.यापैकीच एक म्हणजे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होय.

बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांचे नाते जणूकाही भावा बहिणीचे होते.लता मंगेशकर यांच्या सोबत सुख आणि दुःखामध्ये नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून भावाचे कर्तव्य पूर्ण केले.ठाकरे कुटुंबियांसोबत लतादीदी यांचे संबंध अतिशय आपुलकीचे होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपल्या वरील वडिलांचे छत्र हरवल्याची भावना पुन्हा एकदा निर्माण झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या निधनाअगोदर काही जवळच्या व्यक्तींची भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती त्यामध्ये लता मंगेशकर या होत्या.लता मंगेशकर यांनी बाळासाहेबांच्या जाण्यानंतर ही ठाकरे कुटुंबियांसोबत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता.