Home » भारतीय लष्करात पराक्रम गाजवणा-या मराठमोळ्या ‘मुधोळ हाउंड’ विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
Infomatic

भारतीय लष्करात पराक्रम गाजवणा-या मराठमोळ्या ‘मुधोळ हाउंड’ विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

काळानुसार स्टेटस सिम्बॉल चे निकष सुद्धा बदलत चालल्याचे दिसून येते. विविध टप्प्यांवर प्राणी ,पक्षी पाळणे हे एक प्रकारे स्टेटस सिम्बॉल बनू लागले.हत्ती ,घोडे ,उंट यांसारखे सशक्त प्राणी सैन्यामध्ये असणे हे पूर्वी राजेरजवाड्यांच्या साठी शक्तिप्रदर्शनाचा मार्ग मानला जात असे.आधुनिक काळामध्ये सुदधा विविध प्रकारचे पाळीव प्राणी पाळणे हे प्राण्यांवरील प्रेम किंवा हौस प्रमाणेच कधीकधी स्टेटस सिम्बॉल ही मानले जाते. खूप मोठ्या प्रमाणात पाळला जाणारा प्राणी म्हणजे कुत्रा होय.

सध्या कुत्र्याच्या अनेकविध प्रकारच्या प्रजाती आपल्याला पाळीव प्राण्यांमध्ये दिसून येतात. त्यांपैकी काही पाळीव कुत्रे परदेशातून मागवलेली असतात .या पाळीव प्राण्यांना लागणारा आहार व त्यांच्या सवयी हे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला नेहमीच परवडणारे नसते. शिकारी कुत्रे हे पाळीव कुत्र्यांपेक्षा खूपच वेगळे असतात व पूर्वीच्या काळी या शिकारी कुत्र्यांना संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व दिले जात असे.

सध्या काही ठिकाणी शेतांच्या राखणीसाठी अशा प्रकारची कुत्री पाळली जातात. आज आपण अशाच एका कुत्र्यांच्या प्रजाती विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी केवळ शेतांच्या रक्षणासाठी नव्हे तर चक्क सैन्याच्या सेवेत अमूल्य असे योगदान दिले आहे. कुत्र्यांची ही प्रजाती म्हणजे मुधोळ हाउंड होय.

मुधोळ हाउंड या प्रजातीच्या कुत्र्यांचा इतिहास हा तर कर्नाटकातील मुधोळ संस्थानामध्ये सापडतो. मुधोळ संस्थान हे घोरपडे घराण्याचे आहे.अठराशे अठरा साली आष्टी च्या युद्धानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात हे संस्थान गेले.घोरपडे संस्थानाने आपल्या प्रजेच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले.मुधोळ संस्थानाला चालवणार्‍या राजांपैकी महत्त्वाचे म्हणजे मालोजीराव घोरपडे होय.

मालोजीराजेंनी युद्धांसोबतच समाजहितासाठी चांगले रस्ते व अन्य नागरी सुविधा निर्माण करण्यावर भर दिला होता. मालोजीराजांनी ब्रिटीशांच्या बाजूने काही युद्ध सुद्धा लढली. इराणच्या राजाकडून मालोजीराजांना हाऊंड जातीचा कुत्रा भेट देण्यात आला होता कारण मालोजीराजांनी कुत्र्यांची आवड होती.

मालोजीराजांनी या इराणी हाउंड प्रजातीच्या कुत्र्याचे कारवानी शिकारी कुत्र्यासोबत संकर करून मुधोळ हाउंडची निर्मिती केली.  या प्रजातीला मुधोळ हाउंड हे नाव इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज यांनी दिले. अतिशय काटक व उमद्या दिसणाऱ्या मुधोळ हाऊंड प्रजातीच्या कुत्र्यांना संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली.शरिराने तगडे असलेले मुधोळ हाउंड अतिशय रागीट म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

या कुत्र्यांना पाळीव कुत्र्याप्रमाणे हाताळलेले अजिबातच आवडत नाही मात्र त्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर ते आपल्या मालकाच्या सूचना अतिशय प्रामाणिकपणे ऐकतात. या प्रजातीच्या कुत्र्यांची स्फोटके हुंगण्याची क्षमता खूप तीव्र असते‌.यामुळे काही वर्षांपूर्वी सैन्यदलामध्ये मुधोळ हाउंडला भरती करण्यात आलज. 2017 सालापासून मात्र अतिशय नियमितपणे मुधोळ हाउंडला भारतीय सैन्य दलात प्रवेश देण्यात आला आहे.