Home » मुंग्यांना पळवून लावण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून बघा…!
Infomatic

मुंग्यांना पळवून लावण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून बघा…!

आपल्या घरांमध्ये बऱ्याचदा काही कीटकांचा किंवा जीव जंतूंचा उपद्रव झाल्याचे आढळून येते.घर किती जरी स्वच्छ ठेवले तरी काही जीवजंतू हे घरामध्ये येतातच त्यांपैकी एक म्हणजे मुंग्या होय.मुंग्या मुळे खूप त्रास सुद्धा सहन करावा लागतो.मुंग्यांना घालवण्यासाठी चे काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.

१) खडू :- खडू मध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा घटक असतो.कॅल्शियम कार्बोनेट मुळे मुंग्यांना दूर केले जाऊ शकते.म्हणूनच मुंग्या घालवण्यासाठी खडू च्या रेषा ओढणे खूपच प्रभावी ठरते.

२) काळी मिरी-काळी मिरी पासून सुद्धा मुंग्या दूरच राहतात म्हणूनच मुंग्यांना घालवण्यासाठी काळी मिरी व मिठाचे पाणी एकत्र करून या मिश्रणाचा स्प्रे शिंपडला तरिही मुंग्यांना घालवले जाऊ शकते.

३) लिंबू :- लिंबाच्या उग्र वासामुळे सुद्धा मुंग्यांना घालवता येऊ शकते.यासाठी ज्या ठिकाणी मुंग्या असतात अशा ठिकाणी लिंबाचा रस किंवा लिंबाची साले टाकावेत.

४) मीठ :- मिठाच्या वापरामुळे सुद्धा मुंग्यांचा उपद्रव दूर करता येऊ शकतो.ज्या ठिकाणी मुंग्या निघतात अशा ठिकाणी मीठ टाकून ठेवावे.

५) संत्र्याची साल :- संत्र्याची साल हा उपाय सुद्धा मुंग्यांना घालून देण्यासाठी प्रभावी ठरणारा उपाय आहे.यासाठी एक कप पाण्यामध्ये संत्र्याच्या सालांची छानशी पेस्ट तयार करावी व ही पेस्ट ज्या ठिकाणी मुंग्या निघतात अशा ठिकाणी लावावी.

६) पांढरे विनेगर :- पांढरे विनेगर च्या वासाने ही मुंग्या दूर जातात म्हणूनच मुंग्या निघतात अशा ठिकाणी पांढरे विनेगर शिंपडावे.

७) एप्पल साइडर विनेगर :- एप्पल साइडर विनेगर मुळे सुद्धा मुंग्यांचा त्रास दूर केला जाऊ शकतो.यासाठी थोड्याशा पाण्यामध्ये आपण एपल साइडर विनेगर एकत्र करून हे पाणी मुंग्या निघत असलेल्या ठिकाणी शिंपडावे.या मिश्रणाने ओटा किंवा फरशी पुसली तर मुंग्या अन्नपदार्थां पर्यंत येत नाहीत.

८) दालचिनी :- दालचिनी या मसाल्याच्या पदार्थांच्या वापराने ही मुंग्यांना घालवले जाऊ शकते .दालचिनीच्या वासाने सुद्धा मुंग्या दूर पळून जातात.