Home » लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून मनोज कुमार यांनी केली होती ‘या’ चित्रपटाची निर्मिती…
Infomatic

लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून मनोज कुमार यांनी केली होती ‘या’ चित्रपटाची निर्मिती…

बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेते दिवंगत मनोज कुमार हे देशभक्तीपर चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध होते.त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांची जणूकाही एक मालिकाच प्रेक्षकांसाठी निर्माण केली.या चित्रपटांद्वारे त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचे व भारतीय समाजव्यवस्थेमध्ये खोलवर रुजलेल्या समस्या यांचेही दर्शन प्रेक्षकांना घडवले.त्यांचे आपल्या देशावर असलेले प्रेम त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतींमधून वेळोवेळी दिसले आहे.

मनोज कुमार यांना म्हणूनच भारत कुमार असे म्हटले जात असे. शहीद, रोटी कपड़ा और मकान, उपकार, पूरब और पश्चिम, क्रांति या चित्रपटांची निर्मिती मनोज कुमार यांनी केली होती.मनोज कुमार यांच्या उपकार या चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.हा चित्रपट निर्माण करण्यामागे एक अतिशय रंजक असा किस्सा आहे तो सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.

उपकार हा मनोज कुमार यांचा चित्रपट सुपरहिट चित्रपट होता.या चित्रपटातील मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती हे गाणं आज सुद्धा सर्वांच्या ओठावर आहे.कोणत्याही देशभक्तीपर कार्यक्रमाच्या वेळी हे गाणे हमखास वाजवले जाते .हा चित्रपट कसा निर्माण केला गेला याचा किस्सा जाणून घेणे निश्चितच उत्सुकतेचे ठरेल.

मनोज कुमार यांनी निर्माण केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांचे अनेक चाहते होते. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना सुद्धा मनोज कुमार यांचे देशभक्तीपर चित्रपट खूप आवडत असत.एका चित्रपटाच्या कामाच्या निमित्ताने मनोज कुमार लालबहादूर शास्त्री यांना भेटावयास गेले होते.त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना जय जवान जय किसान या ना-या बद्दल सांगितले व या नाऱ्या वर आधारित चित्रपट बनवण्याचा विचारही बोलून दाखवला.

लालबहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना सांगितले की या चित्रपटाद्वारे मला भारतातील महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांना प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे आहे. त्यांचे प्रयत्न लोकांना समजावून द्यायचे आहेत.मनोज कुमार यांना ही कल्पना खूपच आवडली व त्यांनी हा चित्रपट मी नक्कीच बनवेल असे आश्वासन दिले.लालबहादूर शास्त्री यांची भेट घेऊन मनोज कुमार मुंबईकडे रेल्वेने येणार होते.

या प्रवासामध्ये त्यांच्या डोक्यात जय जवान जय किसान या ना-याच्या धर्तीवर आधारित चित्रपट बनवण्याचे विचार घोळत होते व त्यांनी पेन व डायरी घेऊन या चित्रपटा संदर्भात कथा लिहिण्यास सुरुवात केली.ज्यावेळी ते मुंबईला पोहोचले त्यावेळी या चित्रपटाची कथा अगदी प्राथमिक स्वरुपात तयार होती.या नंतर त्यांनी हा उपकार हा चित्रपट तयार केला.या चित्रपटाच्या निर्मिती च्या अगोदर मनोज कुमार यांची राज कपूर यांच्या सोबत भेट झाली.राजकपूर हे वन मॅन शो होते.

ते स्वतः चित्रपट दिग्दर्शित करत व या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका ही साकारत.उपकार या चित्रपटाची कथा ऐकल्या नंतर त्यांनी मनोज कुमार यांना म्हटले जर तुझ्या मध्ये हिंमत असेल तर तू स्वतः या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून दाखव. त्यांचे हे आव्हान स्वीकारून मनोज कुमार यांनी स्वतः या चित्रपटात अभिनय केला.हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला व फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सुद्धा या चित्रपटाला मिळाला.