Home » हिंदू असूनही महानुभाव पंथ दफनविधी का करतात? जाणून घ्या यामागील सत्य…!
Infomatic

हिंदू असूनही महानुभाव पंथ दफनविधी का करतात? जाणून घ्या यामागील सत्य…!

भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या श्रद्धा आणि भक्तीला विविध स्वरूपामध्ये अभिव्यक्त केले जाते.भारतामध्ये विविध जाती,धर्म यांच्या प्रमाणेच पंथ सुद्धा अस्तित्वात आहेत.सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक परिस्थितीनुसार या पंथाची स्थापना कालपरत्वे भारतामध्ये होत गेली.हे सर्व पंथ आजही भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत.प्रत्येक पंथ आपापल्या प्रथा व परंपरा यांचे पालन करत असतात.महानुभाव पंथ हा असाच एक पंथ आहे ज्याला ही थोर परंपरा लाभली आहे.महानुभव पंथाची स्थापना 1267 साली चक्रधर स्वामी यांनी केली होती.

महानुभाव पंथ हा सर्वसमावेशकतेचा ची सुरुवात होती.त्याकाळी वर्णव्यवस्था अस्तित्वात होती.या वर्णव्यवस्थेवर चक्रधर स्वामी यांनी महानुभव पंथाच्या आधारे हल्लाबोल केला.वर्ण व्यवस्थेमुळे प्रत्येकाला आपापली कामेही वाटून दिली गेली होती व या विषमता आधारित रचनेमध्ये स्त्रिया आणि शूद्र यांना सर्वात खालचे स्थान होते.स्त्रिया,शूद्र या सर्वांनाच आपापल्या भक्तिमार्ग निवडण्याचा व या ऐहिक सुखाच्या आयुष्यापासून विलग होत परमार्थाची वाट धरण्याचा अधिकार महानुभव पंथाने दिला.

महानुभव पंथाने स्त्रिया,शूद्र व समाजातील प्रत्येक घटकाला संन्यासी होण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.महानुभाव पंथाने प्राचीन काळापासून मांडले गेलेले पुजेचे स्तोम उलथवून टाकले.स्त्रिया आणि शूद्र यांना संन्यासी होण्याचा अधिकार महानुभव पंथाने दिला.महानुभव पंथ हा केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पंजाब आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा पोहोचला होता.महानुभव पंथाने स्वतःचे असे काही तत्त्वज्ञान व विचार एकत्रित केले आहेत.आज सुद्धा या पंथांमध्ये समाविष्ट होणाऱ्या व्यक्तींना या नियमांचे पालन करावे लागते.

अहिंसा आणि शाकाहार हे अगदी काटेकोरपणे महानुभव पंथीयांना पाळावे लागते.महानुभाव स्वीकारलेल्या व्यक्तींच्या मृ’त्यु’नंतर त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार न करता त्यांचे पार्थिव हे दफन केले जाते.मनुष्याच्या मृ’त्यु’नंतर ही आत्मा नष्ट होत नाही आत्म हा नश्वर नसतो असे मानले जाते.यासाठी या पार्थिवाला दफन केले जाते व या पार्थिवाच्यावर साधारण दोन पोती मीठ टाकले जाते.

या दफनविधी ला निक्षेप असे म्हणतात.महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचा खडुकली येथे निवास होता त्यावेळी त्यांच्या एका भक्ताचे निधन झाले सर्वात प्रथम या भक्ताचा दफनविधी करण्यास चक्रधर स्वामींनी सांगितले व इथूनच निक्षेपास सुरुवात झाली.महानुभाव पंथामध्ये अंत्यसंस्कार करताना पार्थिवाला अग्नी दिला जात नाही.