Home » एकेकाळी ५०० रुपयांनी व्यवसायाची सुरूवात करणारा अंबानी परिवार आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक…!
Infomatic

एकेकाळी ५०० रुपयांनी व्यवसायाची सुरूवात करणारा अंबानी परिवार आज आहे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक…!

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत.मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील श्रीमंत उद्योजकां पैकी  एक आहेत.मुकेश अंबानी यांनी उद्योगजगतातील कामगिरीमुळे आपले स्वतःचे नाव प्रस्थापित केले आहे.मुकेश अंबानी यांच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे लोक त्यांना ओळखतात व अंबानी कुटुंबीयांच्या वारश्यामुळे त्यांना एवढी संपत्ती प्राप्त झाली आहे त्यामध्ये त्यांचे स्वतःचे असे काही कर्तब नाही असेही म्हटले जाते.

मात्र अंबानी कुटुंबीयांनी केवळ पाचशे रुपये इतक्या भांडवलावर इतका मोठा व्यवसाय वाढवला आहे हे सांगितले तर निश्चितच आश्चर्य वाटेल.हे खरे आहे की सुरुवातीच्या काळामध्ये अंबानी कुटुंबीयांनी खूप वेगवेगळे व्यवसाय केले त्यांपैकी पहिला व्यवसाय म्हणजे मसाल्यांचा व्यवसाय.

मुकेश अंबानी यांचे वडील व प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत धीरूभाई अंबानी मुंबई मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी केवळ पाचशे रूपयांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती.सुरुवातीचा त्यांचा व्यवसाय मसाल्याचा  होता.त्यानंतर आपल्या चिकाटीने त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले स्थान निर्माण केले.आज घडीला मुकेश अंबानी आपल्या वडिलांचा हा वारसा पुढे चालू ठेवत हुशारीच्या जोरावर सध्या ते 14 हजार कोटी संपत्तीचे मालक आहेत व अतिशय ऐषोरामात आपले जीवन जगत आहेत.