Home » भारताच्या राष्ट्रपतींच्या गाडीवर नंबर प्लेट का नसते? जाणून घ्या यामागील कारण…
Infomatic

भारताच्या राष्ट्रपतींच्या गाडीवर नंबर प्लेट का नसते? जाणून घ्या यामागील कारण…

तुमच्याकडे कार असेल तर त्यावर एक नंबर प्लेट असते यावरील रजिस्टर्ड नंबरच्या आधारे त्या कारची व कारच्या मालकाची ओळख केली जाऊ शकते.तुम्ही रजिस्टर नंबरची नंबर प्लेट न लावता गाडी चालवली तर तुम्हाला दंड होऊ शकतो व तुमची गाडी जप्तसुद्धा केली जाऊ शकते.मात्र भारतामध्ये अशा काही  गाड्या आहेत ज्या बिना नंबर प्लेट च्या चालविल्या जाऊ शकतात.तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल किंवा काही लोक तर यावर विश्वास ठेवणार नाही.

मात्र भारतामध्ये भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,राज्यांचे राज्यपाल व अन्य काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांवर नंबर प्लेट नसतात. भारताच्या विदेश मंत्रालयाकडेही १४ गाड्या आहेत ज्यांना नंबर प्लेट नाही.या गाड्या भारत सरकारच्या विदेशी पाहुण्यांना आणण्यासाठी व त्यांना फिरवण्यासाठी वापरल्या जातात. या गाड्यांवरही नंबर प्लेट नसते.

भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे.भारत हे समानता मानणारे राष्ट्र आहे.मग अशा प्रकारे या काही निवडक व्यक्तींच्या गाड्यांवर नंबर प्लेट का नाही तर यामागे आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिशा़चे कायदे व नियम आहेत.ब्रिटिश भारत सोडून गेले असले तरी हे नियम आणि कायदे आज सुद्धा भारतामध्ये अस्तित्वात आहेत व या कायद्यानुसार “king is  never wrong” म्हणजे राजा हा कधीच चुकत नसतो त्यामुळे त्याला हे नियम लागू होत नाही ही विचारसरणी आहे.तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या गाडीवर नंबर प्लेट ऐवजी अशोक स्तंभाचे चिन्ह असते. मात्र आता काही वर्षांपासून या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांनासुद्धा नंबर प्लेट देण्याच्या दृष्टीने विचार चालू आहे.