Home » म्हणून बाळासाहेब ठाकरेंना लोक घाबरत असत…
Infomatic

म्हणून बाळासाहेब ठाकरेंना लोक घाबरत असत…

भारतीय राजकारणामध्ये काही व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत ज्यांच्या केवळ नावानेच समोरच्या व्यक्तीला जरब बसते.अशाच व्यक्तिमत्त्वां पैकी एक म्हणजे शिवसेना पक्षाचे संस्थापक श्रीबाळासाहेब ठाकरे होय.बाळासाहेब ठाकरे यांच्या बोलण्यात,वागण्यात व देहबोली मध्येच एक प्रकारची जरब होती त्यामुळे समोरची व्यक्ती नेहमीच त्यांना दबून राहत असे.एका मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला गेला होता की मुंबईतील लोक तुम्हाला का घाबरतात याचे उत्तर म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की मला लोक घाबरले नाहीतर माझ्या असण्याचा काय फायदा,तुम्ही सिंहाला पिंज-यामध्ये ठेवले व त्याची भीती न वाटता लोक त्याला भुईमुगाच्या शेंगा खाऊ घालत असतील तर त्याच्या असण्याचा काय फायदा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले होते की मी सिंह आहे व या गोष्टीचा मला अभिमान आहे.चित्रपटसृष्टीतील लोक बाळासाहेब ठाकरे यांना घाबरतात असे त्यांना नेहमी विचारले जात असे.चित्रपटसृष्टीतील लोकांना बाळासाहेब ठाकरे कधी आपला चित्रपट बंद पाडतील अशी भीती वाटत असे.यावर ठाकरे यांनी म्हटले आहे की या गोष्टीमध्ये कोणतेही तथ्य नाही हे मात्र खरे आहे की भिती वाटली पाहिजे.

चित्रपटसृष्टीतील अनेक लोक त्यांना माझी भीती वाटते असे सांगतात.ते महाराष्ट्र मध्ये राहून चित्रपटसृष्टीमध्ये काम करून खूप व्यवस्थित कमावत आहेत त्यामुळे त्यांनी अशी दुटप्पी भूमिका घेता कामा नये.बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही स्वतःला मुख्यमंत्रीपद घेतले नाही.यावर ते म्हणत असत की मी मुख्यमंत्री न होता बाहेर राहून रिमोट कंट्रोल द्वारे सरकार चालवू शकतो.सत्ते मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल हे मी एखाद्या रिमोट कंट्रोल प्रमाणे घडवून आणू शकतो असे त्यांचे म्हणणे होते.

मात्र जर देशातील व्यवस्था साफ करण्यासाठी पंतप्रधानपदाची संधी आली तर मात्र मी ती संधी निश्चितपणे घेईल असेही ते म्हणाले होते.पंतप्रधान झाल्यास सर्वात प्रथम कश्मीरच्या मुद्याकडे त्यांना लक्ष घालायचे होते.काश्मीरच्या प्रश्नावर त्यांनी असे म्हटले होते की जे पाकिस्तान व बांगलादेशातील घुसखोर बेकायदेशीरपणे भारताच्या भूमी मध्ये येऊन राहत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे न मागता सरळ गोळ्या घातल्या जातील.असे रोखठोक विचार ते  मांडत असत म्हणून त्यांना सर्व जण घाबरत असत.