Home »  स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या लिपस्टिक बद्दल ‘ही’ मनोरंजक तथ्य तुम्हाला माहीतचं असायला हवी…!
Infomatic

 स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या लिपस्टिक बद्दल ‘ही’ मनोरंजक तथ्य तुम्हाला माहीतचं असायला हवी…!

Female applying red lipstick, close up

आंतरिक सौंदर्याप्रमाणे बाह्य सौंदर्याची सुद्धा काळजी घेण्यावर स्त्री आणि पुरुष असे दोघेही भर देताना दिसून येतात. बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी निरनिराळ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर अगदी आवर्जून केला जातो. विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने अगदी पुरातन काळापासून वापरली जातात. याचे दाखले आपल्या साहित्यामध्ये व निरनिराळ्या इतिहास कालीन शिलालेखामध्ये दिसून येतात. यामध्ये अभ्यंगस्नान ,वनस्पतींचा वापर ,तेलांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येते.

कालानुरूप रासायनिक पदार्थांचा वापर करून सौंदर्य फुलवणारी सौंदर्यप्रसाधने तयार केली जाऊ लागली. लिपस्टिक  हे आज घडीला सर्वाधिक वापरले जाणारे सौंदर्यप्रसाधनं असून प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये लिपस्टिक हमखास सापडते. लिपस्टिकचा टचअप दिल्याशिवाय केलेला साजश्रुंगार सुनाच वाटतो. अशाच या लिपस्टिकचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जातो. लिपस्टिक हा जणू प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला आहे. आज याच लिपस्टिक बाबत आपण काही मनोरंजक तथ्य जाणून घेणार आहोत.

 1. लिपस्टिकचा वापर हा सुरुवातीला स्त्रियांच्या चळवळी आणि आंदोलने यांमधील वावरामध्ये स्त्रियांच्या बंडखोर आणि स्वातंत्र्य वृत्तीच्या अभिव्यक्तीचे प्रतीक काही चळवळींमध्ये मानला गेला.
 2. अमेरिकेमध्ये केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे सर्वसाधारण महिला आपल्या संपूर्ण आयुष्य यामध्ये साधारणपणे $15000 सौंदर्यप्रसाधनं वरती खर्च करते आणि यांपैकी 1780 डॉलर हे केवळ लिप्स्टिक वरती खर्च केले जातात.
 3. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर हेजल बिशप याने एका त्वचाविकार तज्ञाच्या प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना लिपस्टिक च्या बाबतीत एक अनोखा शोध लावला तो म्हणजे आपण लिपस्टिक लावून चुंबन घेतले तरीही त्याचे कोणतेही निशान न सोडणारी स्मज फ्री लिपस्टिक हेजर बिशपने तयार केली.
 4. अनेक महागड्या ब्रँडच्या लिपस्टिक सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत.  महागड्या लिपस्टिक  आपल्या ओठांना सुंदर बनवतातच मात्र यामुळे एक प्रकारचे स्टेटस सिम्बॉल सुद्धा बनते. संपूर्ण जगभरातील महागड्या लिपस्टिकपैकी एक म्हणजे ग्लेलिनची किसकिस गोल्ड  आणि डायमंड लिपस्टिक होय. या एका लिपस्टिकची किंमत सहा हजार पाचशे डॉलर इतकी असून याच्या मूळ ग्लेलिन किसकिस लिपस्टिक चे मूल्य हे केवळ 34 डॉलर इतके आहे याचे कारण म्हणजे ही लिपस्टिक गोल्ड  110 ग्रॅम 18 कॅरेट यापासून बनवलेली असून त्याला त्याला हिरेसुद्धा जडवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये 15 रिफिल करता येऊ शकणाऱ्या शेडसुद्धा उपलब्ध आहेत.
 5. एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन, शार्लोट पर्किन्स गिलमन आणि इतर प्रारंभिक स्त्रीवाद्यांनी 1912 एनवायसी सीफ्रागेट रॅलीमध्ये मोर्चा काढला तेव्हा त्यांचे ओठ मुक्तीचे प्रतीक म्हणून लिपस्टिक ने रंगवले गेले होते.
 6. इजिप्तमध्ये अगदी प्राचीन काळापासून लिपस्टिक वापरली जाते व स्त्री आणि पुरुष या दोघांकडूनही प्राचीन इजिप्शियन संस्कृती मध्ये आपल्या प्रतिष्ठेचे किंवा स्टेटस चे प्रतीक म्हणून लिपस्टिकचा अगदी दररोज वापर केला जात असे. त्याकाळी लिपस्टिक वापरण्यासाठी लाकडाच्या बारीक कांडीच्या आधारे लिपस्टिक लावली जात असे यासाठी लाल, काळा,नारंगी या रंगाच्या छटा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असत.
 7. नंतरच्या काळात इजिप्त मध्ये लिपस्टिक  उच्चभ्रू वर्तुळात मधून हद्दपार झाली होती. मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय करणारे स्त्रियांना ओळखण्यासाठी लिपस्टिक वापरली जाऊ लागली होती. वेश्यांना लिपस्टिक लावल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात होता जेणेकरून त्यांना ओळखणे सोपे जाईल.
 8. प्राचीन रोम मध्ये सुद्धा उच्चभ्रू वर्तुळात लिपस्टिक दररोज वापरली जात असे. श्रीमंत घरातील स्त्रिया प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून  लिपस्टिक लावण्यासाठी त्यांची स्वतःची अशी मेकअप टीम ठेवत असत.मात्र सुरवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांची चरबी सौंदर्य प्रसाधने  बनवण्यासाठी वापरली जात असे.
 9.  दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनावर बंदी घातली होती मात्र लिपस्टिक चे उत्पादन थांबवले गेले नाही कारण लिपस्टिक च्या वापराने मनोबल वाढते असा समज  होता.
 10.  फार पूर्वीपासून  रासायनिक घटकांसोबत काही विशिष्ट प्राण्यांचे कातडी,चरबी व मज्जारज्जू यांचाही वापर केला जात असे. 
 11. मँचेस्टर विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की लिपस्टिक न लावलेल्या ओठांपेक्षा लिपस्टिक लावलेल्या ओठांकडे पुरुषांचे जास्त लक्ष जाते. विशेषतः लाल लिपस्टिक लावलेल्या ओठांकडे पुरुषांचे लक्ष दीर्घकाळ रेंगाळते व त्याखालोखाल गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेल्या ओठांकडे जास्त लक्ष जाते.
 12. राणी एलिझाबेथ हिला लिपस्टिकची प्रचंड आवड होती. राणी एलिझाबेथ यांच्या मते लिपस्टिटमध्ये आजार बरे करण्याची प्रचंड अशी जादुई शक्ती आहे असे त्या मानत होत्या त्यामुळे जेव्हा ती आजारी पडत असे तेव्हा मोठ्या प्रमाणात लिपस्टिकचा वापर करत असे.