Home » राजकारणात येण्यापूर्वी असे होते राहुल गांधी ह्यांचे जीवन…!
Infomatic

राजकारणात येण्यापूर्वी असे होते राहुल गांधी ह्यांचे जीवन…!

सध्या संपूर्ण जगभरात सुरू असलेल्या राजकीय शिमग्यामध्ये अगदी घट्टपणे केवळ एक माणसाची दुस-यासोबत नाळ जोडण्याचा प्रयत्न करत भारत जोडोयात्रा करणारे राहुल गांधी नक्की आपले आगळेपण अधोरेखित करतात. राजकीय व्यक्तिमत्त्व बनण्याअगोदर राहुल गांधींचे आयुष्य नेमके कसे होते हे जाणून घेणार आहोत.

१) राहुल गांधी यांचा जन्म १९७० साली दिल्ली येथे झाला. प्रसिद्ध राजकारणी परिवार गांधी परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आजी माननीय श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच राजीव गांधींनीही भारताचे पंतप्रधान पद भूषविले होते.

२) राहुल गांधी यांचे सुरुवातीचे शिक्षण डून स्कूल मध्ये झाले मात्र त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांची ह’त्या झाल्यानंतर त्यांचे व बहीण प्रियंका यांचे शिक्षण घरीच करण्यात आले.

३) फिटनेस घ्या बाबत काटेकोर असलेले राहूल गांधी रायफल शुटिंग आणि जापानी तायक्वांदो या क्रिडाप्रकारात अव्वल होते. दिल्ली येथील स्टीफन्स कॉलेज मध्ये त्यांनी पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

४) अर्थशास्त्रात शिक्षण घेण्यासाठी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला मात्र याच वेळी वडील व तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे नि’ध’न झाले त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले.

५) ट्रिनिटी कॉलेज मधून त्यांनी एम फिल पूर्ण केले.

६) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तीन‌ वर्षे  लंडन येथील मॉनिटर ग्रुपमध्ये काम केले.

७) २००४ साली गांधी घराण्याच्या वारसा पुढे चालवत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या कुटुंबात आजी, वडील यांच्या ह’त्या झाल्यानंतरही सकारात्मक पुढे राजकारणात वावरणारे राहुल गांधी हे एक भावी राजकारणाचा आशादायी चेहरा आहे.