Home » डांबर गोळ्याचा चुकीचा वापर केल्यास होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, असा करा योग्य वापर…!
Infomatic

डांबर गोळ्याचा चुकीचा वापर केल्यास होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, असा करा योग्य वापर…!

आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात काही विशिष्ट भावना असतात या भावना त्या ठिकाणचा विशिष्ट वास, गंध यांमुळे जिवंत होतात. आपल्या घरातील कपड्यांची कपाटे व विशेष करून महागड्या ठेवणीतल्या कपड्यांच्या कपाटात डांबर गोळ्यांचा ग़ध अगदी पिढ्या न पिढ्या भरुन असतो.

या डांबर गोळ्या कपड्यांना जीवजंतू, किडीपासून वाचवण्यासाठी वापरल्या जातात. वारंवार न घातलेल्या कपड्यांना बंदिस्त ठेवल्याने दर्प येतो, हा दर्प ही डांबर गोळ्यांमुळे कमी होतो. अशा उपयुक्त डांबर गोळ्या वापरताना काळजी कशी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत.

१) डांबर गोळ्या या एक चतुर्थांश डायक्लोरोबेंझिनचा वापर करून बनवल्या जातात. या डायक्लोरोबेंझिनमुळे कपड्यांचे संरक्षण होते मात्र हा पदार्थ ज्वलनशील असतो. व या वासामुळे संवेदनशील आरोग्य असलेल्या व्यक्तींना सर्दी, श्वसन विकार होऊ शकतात म्हणून या कपड्यांना वेळोवेळी हवा द्यावी. कपडे कपाटातून काढून लगेच घालणे टाळावे.

२) डांबर गोळ्यांचा अतिरिक्त वापर केल्यास श्वासोच्छ्वास घेणे, यकृताचे कार्य, पचन कार्य यांवरही प्रभाव पडतो.

३) डांबर गोळ्यांचे स्थायू रुपातून वायू अवस्थेत रुपांतर होऊन या वाटेने वाळवी आणि तत्सम जंतूंचा नाश होतो. बाजारातून नकली डांबर गोळ्या घेण्यापासून सावध राहावे.

४) कपड्यांना कसर लागू नये व‌ वास चांगला राहावा यासाठी नैसर्गिक पदार्थ जसे की कापूरचा वापर करता येऊ शकतो.