Home » नवरा-बायकोच्या भांडणात सुरु झाला गुगल मॅपचा प्रवास…!
Infomatic

नवरा-बायकोच्या भांडणात सुरु झाला गुगल मॅपचा प्रवास…!

गुगल मॅपचा शोध कसा लागला चला तर मंग जाणून घेऊया यामागील भन्नाट किस्सा ,गुगलचे CEO सुंदर पिचई यांना त्यांच्या पत्नी सोबत जेवायला जायचं होतं, त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की तू जेवणाच्या ठिकाणी पोहोच मी तुला थेट तिथे भेटतो. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांची पत्नी त्या ठिकाणी 8 वाजेला पोहचली.

सुंदर पिचई हे देखील ऑफिस मधून वेळेवर निघाले परंतु ते रस्ता चुकले त्यामुळे त्यांना ठिकाण शोधता शोधता 10 वाजले.आता कोणाची पत्नी इतका वेळ थांबेल तसेच वाट बघून त्यांची पत्नी घरी निघून गेली. वेळेवर न पोहचल्यामुळे तिला प्रचंड राग आला होता ती सुंदर पिचई यांच्यावर खूप नाराज होती.

ते जेव्हा घरी आले तेव्हा त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे सुंदर पिचई हे रागाने ऑफिसमध्ये गेले आणि विचार करू लागले अस काय बनवता येईल ज्याने माणूस रस्ता चुकणार नाही. रात्रभर विचार केल्यावर त्यांनी सकाळी त्यांच्या टीमसमोर गूगल मॅपची आयडिया सांगितली.

तेव्हा त्यांना संगळ्यांनी नकार दिला.परंतु त्यांनी हार मानली नाही अखेर त्यांनी त्यांच्या टीमला व्यवस्थित समजावून सांगितले आणि 2005 मध्ये अमिरीकेत गूगल मॅपची सुरुवात झाली. त्यानंतर भारतामध्ये देखील 2008 मध्ये गुगल मॅपणे प्रवेश केला. आता मात्र गुगल मॅपची गरज इतकी वाढली की प्रत्येक जण गुगल मॅपचा वापर करत आहे. खेड्यापाड्यात देखील गूगल मॅपचा वापर करत आहे.