Home » गणपती बाप्पा ला दुर्वा का वाहिली जाते आणि जाणून घ्या दुर्वाचे आपल्या आरोग्यासाठी असणारे आरोग्यदायी फायदे… 
Infomatic

गणपती बाप्पा ला दुर्वा का वाहिली जाते आणि जाणून घ्या दुर्वाचे आपल्या आरोग्यासाठी असणारे आरोग्यदायी फायदे… 

गणेशोत्सव असो किंवा संकष्टी चतुर्थी असो हमखास एका वस्तूला महत्त्व दिले जाते ते म्हणजे गणेशाला प्रिय असणारी दुर्वा.गणपतीला दुर्वा का इतक्या प्रिय असतात, याची जी गोष्ट सांगितली जाते, त्यातही दुर्वांचे अनेक फायदे सांगितलेले आहेत.दुर्वांचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो.पण दुर्वांचा फक्त तेवढाच उपयोग नाही.दुर्वा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून त्वचाविकारांपासून ते पचन संस्थेतील दोष कमी करण्यापर्यंत अनेक आजारांसाठी दुर्वांचा रस घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.

गणपतीचे पूजन करतावेळी पूजेच्या साहित्यात दुर्वांचा हमखास समावेश असतो.तुम्हाला माहीत आहे का दुर्वांला आयुर्वेदिक औषधीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.दुर्वांमध्ये अनेक पौष्टिक घटक आणि औषधी गुणधर्म असतात.दुर्वाचा उपयोग पूजेसाठी तर केलाच जातो परंतु त्याचबरोबर औषधी वनस्पती म्हणून देखील दुर्वाचा वापर केला जातो.दुर्वा ही हृदयरोग,यौनरोग आणि बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर एक रामबाण उपाय आहे.

गणपतीला दुर्वा का वाहिली जाते…

गणांचा अधिपती म्हणजे गणपती.हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणतेही कार्य करायचे असेल तर अगोदर गणपतीची पूजा करतात.तुम्ही बघितलेच असेल गणपतीची पूजा करता वेळी दुर्वाला जास्त महत्व देतात.गणपतीला २१ दुर्वांची जुडी वाहिली जातेमिळून केलेली जुडी.गणपतीला दुर्वा का बर वाहत असेल.तर आज आपण गणपतीला दुर्वा का वाहिली जाते याविषयी जाणून घेऊया.

असलासुर नावाचा राक्षस ऋषी मुनी आणि देवता यांना खुप त्रास देत होता.देवतांनी गणेशजींना विनंती केली तेव्हा गणपतीने त्या असुरला गिळून टाकले त्यामुळे गणपतीच्या पोटामध्ये जळजळ होऊ लागली तेव्हा ऋषी मुनींनी २१ दुर्वांच्या जुड्या गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी गणपतीला दुर्वांच्या २१ जुड्या खाण्यास दिल्या.तेव्हा खूप प्रयत्नानंतर गणपतीच्या पोटात होणारी जळजळ कमी झाली. त्यावेळी गणराया असे म्हंटले होते की त्यांना जे कोणी दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञ,व्रत आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल.म्हणून गणपतीला दुर्वा वाहिली जाते.

दुर्वाचे आरोग्यासाठी कोणकोणते फायदे आहेत ते बघूया…

दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे.मानसिक शांतीसाठीही आणि इतर विकारांसाठी दुर्वा लाभकारक आहे.कर्करोग असणाऱ्या रुग्णांना दुर्वा लाभदायक असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

आयुर्वेदानुसार दुर्वाच्या पानापासून मुळापर्यंत सर्वांचा उपयोग अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो.दुर्वांची चव थोडीशी गोडसर असते यामध्ये प्रथिने,कर्बोदके,कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम घटक असतात.ही सर्व तत्वे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर गुणकारी आहे.जसे की पित्त,पोटासंबंधीत समस्या,यौनरोग,हृदयविकार.

१) सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर : त्वचेवर मुरूम असेल तर दुर्वाचा रस करुन प्यावा.तसेच उष्णतेमुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा तोंड आले असेल यावर देखील दुर्वांचा रस पिणे उत्तम आहे.शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी देखील दुर्वा फायदेशीर आहे.पिंपल्स आले असतील तर दुर्वा आणि हळद यांची पेस्ट करुन लावावी.दुर्वांचा रस पिल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि तसेच चेहऱ्यावर ग्लो येतो.

२) स्त्रियांचे आजार कमी होतात : युरीन इन्फेक्शन प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते.युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी दुर्वा अतिशय प्रभावी आहे.युरिन इन्फेक्शन झाले असेल तर दुर्वांच्या रसामध्ये लिंबू पिळून तो रस घ्यावा असे दिवसातून दोन वेळेस केल्यास लगेच आराम मिळतो. मासिक पाळीमध्ये पोट दुखत असेल किंवा खुप जास्त ब्लिडिंग होत असेल अशावेळी दुर्वांचा रस घ्यावा.

३) अंगावरून पांढरे जात असल्यास : खुप साऱ्या महिलांच्या अंगावरून पांढरे पाणी जाते.अंगावरून पांढरे जाणे म्हणजे काही तरी संसर्ग झाला आहे.त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी दुर्वांचा रस आणि दही मिक्स करून प्यावे.यामुळे आराम मिळतो. 

४) साखरेची पातळी नियंत्रणात राहते : दुर्वांचा रस नियमित पिल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहींसाठी दुर्वांचा रस अतिशय गुणकारी आहे. हा रस मधुमेह असणाऱ्यांनीच घ्यावा, असे काही नाही.सण किंवा काही समारंभ असल्यावर गोड पदार्थ खाण्यात येतात.यावेळी शरीरातील वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुर्वांचा रस घेणे फायद्याचे ठरते.

५) रोगप्रतिकारशक्ती वाढते : सध्याच्या काळात प्रत्येक जण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे जास्त लक्ष देत आहे.दररोज सकाळी दोन चमचे दुर्वांचा रस घेतला तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे दुर्वांच्या रसाचे नियमित सेवन करावे.

६) मूळव्याध बरा होतो : दुर्वांचा रस  आणि दही मिक्स करून पिल्यास मूळव्याधाचा त्रास भरपुर प्रमाणात कमी होतो. मुळव्याधाच्या सुरुवातीलाच हा उपाय करावा यामुळे आजार वाढणार नाही.

७) पचनक्रिया सुधारते : खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्यामुळे आजकाल पचनाचे आजार जास्त प्रमाणात वाढले आहे.मात्र दररोज दुर्वांचा रस पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट देखील साफ राहते.ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी नियमितपणे दुर्वाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

८) दात आणि तोंडाचे आरोग्य सुधारन्यास मदत : दुर्वांमध्ये ‘फ्लॅवोनाईड्स’ ह्या पोषक घटकांचा समावेश असतो.त्यामुळे अल्सरचा त्रास होण्याचा धोका कमी संभवतो.हिरड्याचे आरोग्य सुधारते तसेच तोंडातुन येणारी दुर्गंधीसुद्धा कमी होते.

९) त्वचेच्या आजारांपासून सुटका  : खाज येणे,रॅशेश येणे आणि विविध त्वचाविकारांवर दुर्वा खुप उपयुक्त आहे. यामध्ये असणारे अ‍ॅन्टीसेप्टिक गुणधर्म त्वचेसंबंधित असणारे आजार कमी करतात.दुर्वाची पेस्ट आणि हळद मिक्स करून त्वचेवर लावावी.

१०) रक्त शुद्ध होते : दुर्वाचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होतेते. दुर्वा ही अल्कॅनिटीचे संतुलन ठेवण्यास मदत करते.तसेच यामुळे इजा,जखम झाल्यास किंवा मासिकपाळीमध्ये अतिरिक्त प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही.दुर्वामुळे शरीराततील लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते आणि परिणामी हिमोग्लोबीनचे प्रमाणही नियंत्रणात राहते.अ‍ॅनिमिया सारख्या आजारापासून दूर ठेवते.