Home » मलाचं का डास चावतात? काही ठराविक व्यक्तींनाच जास्त डास चावण्यामागे देखील आहे वैज्ञानिक कारण…!
Infomatic

मलाचं का डास चावतात? काही ठराविक व्यक्तींनाच जास्त डास चावण्यामागे देखील आहे वैज्ञानिक कारण…!

डास हा एक उपद्रवी जीव आहे. डासांच्या संक्रमणामुळे विविध प्रकारचे आजार पसरतात. अनेकदा डास हे एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात चावतात अशी तक्रार संबंधित व्यक्ती करताना दिसून येते. या तक्रारी मध्ये खरेच तथ्य आहे का हे आपण तपासून पाहूया.

१) जर एखाद्या व्यक्तीने काळे, लाल, करडे यांसारखे गडद रंगाचे कपडे परिधान केले असतील तर त्यांना डास जास्त चावतात असे दिसून आले आहे.

२) मादी डास हा मानवी रक्तातील प्रथिने जास्त प्रमाणात शोषून घेते. याद्वारे नवीन डास निर्मिती केली जाते. न्युयॉर्क येथील संशोधकांनी असे सांगितले आहे की विविध प्रजातींच्या डासांना विविध रक्तगटाच्या व्यक्तींना चावण्याची नैसर्गिक रचना असते. जसे की एडिस इजिप्ती डास ओ रक्तगटाच्या व्यक्तींना जास्त चावतो.

३) डासांना कार्बन डायऑक्साइड सारख्या वायूंच्या गंध जास्त आकर्षित करतो यामुळे जास्त प्रमाणात उच्छवास सोडणा-या व्यक्तींना जसे की गर्भवती महिलांना डास इतरांच्या तुलनेत जास्त चावतात.

४) मानवी त्वचेवर निर्माण होणारे‌ लॅक्टिक एसिड किंवा घामातून स्त्रवणा-या रसायनांमुळे डास आकर्षित होतात म्हणून काही व्यक्तींना मोजे परिधान केलेल्या टाचा, पोट-या याठिकाणी डास चावतात.

५) घामामुळे निर्माण होणा-या एसिडमुळे काही जीवाणू त्वचेवर निर्माण होतात. या विशिष्ट जीवाणूंमुळे डास मोठ्या प्रमाणात आकृष्ट होतात.