Home » अस्सल ‘हापूस आंबा’ कसा ओळखाल, जाणून घ्या ‘अस्सल हापूस आंबा’ ओळखण्याच्या दोन सोप्या पद्धती…!
Infomatic

अस्सल ‘हापूस आंबा’ कसा ओळखाल, जाणून घ्या ‘अस्सल हापूस आंबा’ ओळखण्याच्या दोन सोप्या पद्धती…!

फळांचा राजा म्हणून ‘आंबा’ ओळखला जातो. फळांचा राजा असे बिरूद आंब्याला लावण्यामागे आंब्याचे निरनिराळे फायदे तर आहेतच पण या शिवाय म्हणजे त्याची चव, रंग आबालवृद्धांना नेहमीच भुरळ घालते.उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला की वेध लागतात ते आंब्याचे.बाजारामध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली की त्याची दखल ही प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा घेतली जाते.

ज्या दिवशी उन्हाळ्यातला पहिला हापूस आंबा खाल्ला जातो तो दिवस म्हणजे अगदी ब्रह्मसुखच असे खवय्यांना वाटते. बाजारामध्ये निरनिराळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध असतात पण यामध्ये सुद्धा हापुस आंब्याला प्रचंड मागणी असते.हापूस आंबा विकत घेताना चोखंदळ ग्राहक अभ्यासूपणे चांगल्या प्रतीचा आंबा निवडतात मात्र तरीसुद्धा काही प्रसंगी हापूस आंबा विकत घेताना गल्लत होऊ शकते.

म्हणूनच आज काही सर्वसाधारण निकष जे हापूस आंबा विकत घेताना अगदी पूर्वापारपासून लावले जातात ते आज आपण पाहणार आहोत.हापूस आंबा प्रामुख्याने कोकणामध्ये उगवला जातो. देवगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,मालवण या ठिकाणांचे हापूस आंबे अगदी जगभरात निर्यात केले जातात.

१) हापूस आंबा ओळखण्याची एक साधारण पद्धत म्हणजे त्याचा आकार त्याच्या आकारावरून हापूस आंबा ओळखला जातो. हापूस आंब्याचा आकार हा साधारण कोयरी सारखा असतो म्हणजे देठापासून छोटा व तोंडाचा भाग निमुळता असतो.

२) रत्नागिरीमध्ये पिकवल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची साल ही अन्य आंब्यांच्या तुलनेमध्ये जाड असते.देवगडला पिकलेल्या हापूस आंब्याला ओळखण्याची एक अत्यंत खात्रीशीर युक्ती म्हणजे या हापूस आंब्यांना नैसर्गिकपणे येत असलेला मधुर असा सुगंध होय. हापूस आंब्यांच्या सुगंधाने संपूर्ण घर भरून जाते. अन्य आंब्यांना हापूस आंब्यासारखा नैसर्गिक सुगंध नसतो किंवा तो अगदी थोड्या प्रमाणात असतो.

३) या आधारे हापूस आंब्याची निवड करणे सोपे जाते. कृत्रिम पद्धतीने पिकवला जाणाऱ्या आंब्यांना हापूस आंब्या सारखा सुगंध येत नाही. हापूस आंबा ओळखण्यासाठी त्याचा रंग हा सुद्धा एक उत्तम असा निकष आहे. देवगडला पिकवल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचा हा रंग गडद केशरी असतो आणि तो जसा जसा पिकतो तसा तसा अधिक केशरी होतो. रत्नागिरी हापूस आंब्याचा रंग पिवळसर असतो.

४) नैसर्गिकपणे पिकवल्या गेलेल्या आंब्यांचा रंग अगदी एकसारखा पिवळा किंवा केशरी नसतो. तर कृत्रिम रीत्या पिकवल्या गेलेल्या आंब्यांचा रंग हा अगदी एक सारखा केशरी किंवा पिवळा असतो.झाडावर नैसर्गिक रित्या पिकवले गेलेले हापूस आंबे हे स्पर्श केल्यावर अगदी मऊ लागतात याउलट कृत्रिम रीत्या पिकलेल्या आंब्याचा रंग परिपूर्ण केशरी किंवा पिवळा असला तरी त्यांचा स्पर्श हा कडक असतो.ब-याचदा असा गैरसमज असतो की आंब्याच्या सालीवर सुरकुत्या पडलेल्या असतील तर तो पूर्ण पिकलेला आंबा असतो.मात्र सुरकुत्या पडलेला आंबा अति पिकलेला असतो त्यामुळे तो लवकर खराब होऊ शकतो.