Home » अबब! या गावातील लोक राहतात चक्क उंदरांच्या बिळात, कारण ऐकून आश्चर्य वाटेल…!
Infomatic

अबब! या गावातील लोक राहतात चक्क उंदरांच्या बिळात, कारण ऐकून आश्चर्य वाटेल…!

निवारा किंवा घर हे मनुष्यासाठी मुलभूत गरज मानली जाते. देशातील हवामान वा अन्य गरजा नुसार प्रत्येक भागातील घरांची रचना ही भिन्न असल्याचे आपल्याला दिसून येते. घरांचा मुख्य उद्देश हा तापमानातील बदल आणि सुरक्षेच्या दृष्टीने असतो. कोणत्याही व्यक्तीला आपले घर हे प्रशस्त असावे असे वाटते मात्र अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती ही उंदराच्या बिळात राहते असे सांगितले तर निश्चितच नवल वाटेल.

इराणमध्ये कांदोवन या ठिकाणी  एखादी व्यक्ती नव्हे तर संपूर्ण गाव उंदराच्या बिळामध्ये राहते. कांदोवन हे गाव इराणमधील ताब्रीज शहराजवळ वसलेले आहे. हे गाव प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. मंगोलांच्या आक्रमणापासून स्वतःचा  बचाव करण्यासाठी अशाप्रकारे उंदराच्या बिळाप्रमाणे घराची रचना केली गेली. तेव्हापासून आजपर्यंत याच प्रकारे ही घरे निर्माण केली जातात.

या घरांची खासियत अशी आहे की या ठिकाणी वातावरणातील तापमान  बदलानुसार आपोआप समायोजन केले जाते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये या घरांमध्ये  थंडावा निर्माण केला जातो तर या हिवाळ्यात या घरात थंडीपासून बचाव केला जातो याला कारण म्हणजे या ठिकाणी असलेल्या ज्वालामुखीचा स्त्रोत होय. ही घरे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.