Home » तुमच्या मनात कधी असा विचार आला का,की टॉयलेट पेपर पांढराच का असतो? जाणून घ्या यामागील कारण…
Infomatic

तुमच्या मनात कधी असा विचार आला का,की टॉयलेट पेपर पांढराच का असतो? जाणून घ्या यामागील कारण…

काळानुसार सगळ्यांच्या गरजा आणि सवयी मध्ये हळूहळू बदल होत चाललेला आपल्याला दिसुन येतो.पाहिले घरात पंगतीमध्ये किंवा गोल रिंगण घालून जेवत होते परंतु आता बदलत्या काळानुसार आता डायनिंग टेबल आले आहेत.

तुम्ही नेहमी हॉटेल,विमानतळ,घराच्या वॉशरूममध्ये एक गोष्ट नेहमी पाहिली असेल आणि ती म्हणजे टॉयलेट पेपर. सगळीकडे टॉयलेट पेपर सारखाच आहे आणि त्याचा रंगही सारखाच आहे.क्वचितच असे घडले असेल की तुम्ही पांढऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाचे टॉयलेट पेपर वापरले असतील.

सर्वत्र पांढऱ्या रंगाचे टॉयलेट पेपर असले तरी,जेव्हा तुम्हाला लाल,निळा,हिरवा किंवा इतर कोणत्याही रंगाचा टॉयलेट पेपर वापरावा लागतो तेव्हा फारच कमी असते.परंतु टॉयलेट पेपर फक्त पांढराच का असतो? टॉयलेट पेपर बनवणारे टॉयलेट पेपर पांढऱ्या रंगाचाच का बनवतात? वास्तविक,यामागे अनेक कारणे आहेत,ज्यामुळे टॉयलेट पेपरचा रंग पांढरा आहे.आपण तेच जाणून घेणार आहोत.

आपण कुठे बाहेर फिरायला गेलो की आता रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये आपल्याला इंग्लिश टॉयलेट जास्त प्रमाणात दिसतात.या टॉयलेटमध्ये आपल्याला टिश्यू पेपर दिसतो.क्वालिटी कोणतीही असो हलकी किंवा भारी हे टिश्यू पेपर रंग मात्र पांढराच असतो.

टॉयलेट पेपर कसे बनवले जाते?

टॉयलेट पेपर पांढरा असण्यामागचे कारण सांगण्यापूर्वी,हा टॉयलेट पेपर कसा बनवला जातो ते बघूया.टॉयलेट पेपर सेल्युलोज फायबरपासून बनवला जातो,जो थेट झाडांपासून किंवा कागदाचा पुनर्वापर करुन केला जातो.आधी या फायबरच्या माध्यमातून एक कागद बनवला जातो आणि नंतर तो काही डिझाईनने कापून आणि कापून बाजारात विकला जातो.

या टिश्यू पेपर ला बघून तुमच्या मनात कधी प्रश्न आला का? या टिश्यू पेपरचा रंग पांढराच का असतो.तर आज आपण यामागील कारण जाणून घेणार आहोत…

१) कमी किंमत : या टॉयलेट पेपरला डाय करायची गरज नसते.त्यामुळे कंपन्यांना हा टॉयलेट पेपर तयार करण्यासाठी कमी खर्च येतो तसेच ब्लीच केलेला पांढरा पेपर कमी खर्चीक असतो.तसेच या टॉयलेट पेपरचे लवकर विघटन होते त्यामुळे पर्यावरणासाठी सुरक्षीत आहे.

या व्यतिरिक्त,एक कारण देखील सांगितले जाते की ते पर्यावरणानुसार खूप फायदेशीर आहे.पांढरा कागद पर्यावरणपूरक मानला जातो आणि तो विघटित करणे देखील खूप सोपे आहे.कंपन्या ते हायड्रोजन पेरोक्साइडने ब्लीच करतात,ज्यामुळे ते पांढरे होते आणि यामुळे ते खूप मऊ देखील होते.

२) वापरण्यासाठी योग्य : या टॉयलेट पेपर पासून सेल्युलोज फायबर तयार केले जाते.रिसायकलिंग केलेल्या पेपेरपासून किंवा झाडांपासून आपल्याला सेल्युलोज मिळते.यामध्ये पाणी मिसळून त्याचा लगदा तयार करतात आणि नंतर यापासूनच वेगवेगळे पेपर तयार केली जातात.या कागदालाच ब्लीच करतात आणि त्यालाच टॉयलेट पेपर म्हणून वापरले जाते.

३) शरीराच्या नाजुक भागांसाठी सुरक्षित : वापरतांना हा पेपर स्वच्छ वाटतो शरीराच्या नाजुक भागांवर वापर केला जातो हा पेपर सॉफ्ट असल्यामुळे सुरक्षित मानला जातो.कलर मध्ये असणारा पेपर खरबडीत असतो त्यामुळे तो आपल्यासाठी हानिकारक असतो त्यामुळे पांढरा पेपर वापरणेच आपल्यासाठी योग्य आहे.

४) दीर्घकाळ टिकतो : पांढऱ्या रंगाचा टॉयलेट पेपर टिकाऊ असल्यामुळे कंपन्या पांढऱ्या रंगाचे पेपर बनवण्याला जास्त प्राधान्य देतात.टॉयलेट पेपर मध्ये लिग्निन नावाचा घटक नसतो त्यामुळे तो पिवळा पडत नाही.त्यामुळे तो भरपूर दिवस वापरला जाऊ शकतो.

५) त्वचेसाठी फायदेशीर : सुरुवातीला रंगीत पेपर वापरले जात होते.रंगीत पेपरला कोरडे केले जाते त्यामुळे त्वचेवर इरिटेशन,रॅशेश आणि इतर काही त्वचारोग होऊ शकतात.रंगीत पेपर पांढऱ्या पेपर पेक्षा खरबडीत असतात त्यामुळे वापरण्यासाठी पांढरे पेपर सुरक्षित आहे त्यामुळेच पांढऱ्या पेपरला जास्त मागणी आहे.