Home » मोबाईलची रिंगटोन वाजली की आपण हॅलो कोण बोलतंय असं म्हणतो. पण ‘हॅलो’ हा शब्द नेमका कुठून आला माहिती आहे का?
Infomatic

मोबाईलची रिंगटोन वाजली की आपण हॅलो कोण बोलतंय असं म्हणतो. पण ‘हॅलो’ हा शब्द नेमका कुठून आला माहिती आहे का?

मोबाईलची रिंगटोन वाजली की आपण फोन उचलतो आणि हॅलो कोण बोलतंय असं म्हणतो. पण हॅलो हा शब्द नेमका कुठून आला माहिती आहे का? चला तर मंग जाणून घेऊया. 

१८७६ मध्ये ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला आणि त्यानंतर हॅलो हा शब्द रूढ झाला. ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला परंतु त्यांनी हॅलो या शब्दाचा कधीही वापर केला नाही. त्यांना फोन आल्यावर ‘ahoy’ म्हणायला जास्त आवडायचं. 

काही अफवा अशाही पसरल्या की अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या गर्लफ्रेंडचं नाव ‘मार्गारेट हॅलो’ होतं म्हणून त्यांनी हॅलो हा शब्द आणला, पण प्रत्यक्षात त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव मॅबेल हब्बार्ड असं होत. पुढे चालून त्यांचं लग्न झालं पण ग्राहम बेल तिच्याशी कधीही फोनवर बोलले नाही कारण तिला ऐकायला कमी येत होते. म्हणून हि फक्त एक अफवा आहे कि ग्राहम बेल यांनी हॅलो या शब्दाचा शोध लावला. 

ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार हॅलो हा शब्द इंग्रजी भाषेतला नाहीये. थॉमस अल्वा एडिसन यांनी पहिल्यांदा हॅलो या शब्दाचा वापर केला होता. हॅलो हा शब्द कन्व्हर्सेशनची सुरुवात करण्यासाठी योग्य आहे असं थॉमस एडिसन यांचं म्हणणं होत. एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर हॅलो हा शब्द योग्य आहे आणि तेव्हापासून हॅलो हा शब्द वापरला जाऊ लागला.