Home » ‘या’ कारणामुळे बॉडीगार्ड परिधान करतात काळा गॉगल…!
Infomatic

‘या’ कारणामुळे बॉडीगार्ड परिधान करतात काळा गॉगल…!

जगभरात प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी किंवा सेलिब्रिटी हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्यासोबत सुरक्षारक्षक अर्थात बॉडीगार्ड सोबत ठेवतात. हे बॉडीगार्ड सर्वांचे लक्ष वेधून घेतात. या बॉडीगार्डची वेगळीच देहबोली व राहणी असते. त्यांची खासियत म्हणजे त्यांनी परिधान केलेला काळा रंगाचा गॉगल होय. कोणत्याही देशातील, प्रांतातील बॉडीगार्डला आपण काळा गॉगल घातलेले पाहिले आहे. या काळ्या गॉगल मागे नक्की काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया.

1) सुरक्षारक्षकांनी महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेली असते. सुरक्षारक्षकांना निरीक्षण करायचे असते. या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणे फार मोठी चूक ठरू शकते. अशावेळी काळ्या रंगाच्या गॉगलचा वापर केला तर सुरक्षा रक्षकाच्या निरीक्षण हालचाली संभाव्य हल्लेखोराला समजू शकत नाही व त्याला अलगदपणे टिपणे सहज शक्य होते.

2) काळ्या रंगाचा चष्मा डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतो. सुरक्षारक्षकांना धुके असतानासुद्धा काळा रंगाच्या गॉगल परिधान केल्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येत नाही व या परिस्थितीतही निरीक्षण करण्यासाठी सुरक्षारक्षक तत्पर असतात.

3) एखाद्या छोट्या स्फोटाच्या वेळी सुद्धा सुरक्षारक्षक आपल्या विशिष्ट पद्धतीने निर्माण केल्या गेलेल्या काळ्या गॉगलद्वारे पुढे पाहू शकतात. या चष्म्यांना सहजासहजी तडा जात नाही त्यामुळे डोळ्यांनाही अशावेळी इजा पोहोचत नाही.

4) ज्यावेळी एखादा स्फोट घडतो त्यावेळी हे मनुष्य स्वभावाचा सहज गुणधर्म असतो की आपण डोळे झाकतो. मात्र काळया रंगाचा गॉगल घातल्यामुळे फायदा असा होतो की डोळ्यांना संरक्षण प्राप्त होते व अशा परिस्थितीत सुद्धा सुरक्षारक्षकांचे डोळे उघडे राहतात व ते वेळीच जागरूक होऊन स्फोटाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी पार पाडू शकतात व संबंधित व्यक्तीचे संरक्षण करू शकतात.