Home » कुत्री विनाकारण गाडी मागे धावत नाही, यामागे देखील आहे शास्त्रीय कारण…!
Infomatic

कुत्री विनाकारण गाडी मागे धावत नाही, यामागे देखील आहे शास्त्रीय कारण…!

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. मनुष्याला जगण्यासाठी अन्न ,वस्त्र ,निवारा या गरजां सोबत समूहाची सुद्धा आवश्यकता असते. मनुष्य सोबत अन्य मानवी जीवां सोबतच प्राणिमात्रांचे सुद्धा वास्तव्य असते. यापैकी काही प्राण्यांना मनुष्य पाळतो सुद्धा व त्यांचे अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजीसुद्धा घेतो. कुत्रा ,मांजर हे मनुष्याचे खूप पूर्वीपासून पाळीव प्राणी व मित्र राहिले आहेत.

यापैकी कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी मानला जातो जो माणसाशी केलेली मैत्री ही अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवतो. कुत्रा हा आपल्या धन्याशी इमान राखत घराचे संरक्षण करतो. घराला चोर किंवा अन्य धोक्यांपासून वाचवतो म्हणूनच गाव व शहरांमध्ये सुद्धा कुत्र्याला पाळण्याचे प्रमाण मोठे आहे. या पाळीव कुत्र्यां प्रमाणेच रस्त्यावर सुद्धा अनेक भटकी कुत्री असतात.

या भटक्या कुत्र्यां बद्दल काही लोकांना अतिशय राग येतो यामागचे कारण म्हणजे या कुत्र्याकडून वारंवार भुंकले जाणे व विशेषतः जेव्हा एखादी गाडी रस्त्यावरून आवाज करत धडधड करत जाते तेव्हा हमखास ही कुत्री त्या गाडीचा पाठलाग करतात व अनेकदा या पाठलागामध्ये गाडी चालवणाऱ्याचा तोल सुद्धा जातो. गाडीचा आवाज ऐकल्यावर कुत्रा हा अगदी जीवाच्या आकांताने का पाठलाग करतो यामागची काही कारणे आज आपण जाणून घेणार आहोत.

  1. अतिशय इमानदार व हुशार मानली जातात असलेल्या कुत्र्याला घरामध्ये जर कोणी बाहेरची व्यक्ती आली तर कुत्रे ही वासाने ते ओळखतात त्यांची ज्ञाणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात म्हणूनच जेव्हा एखादी गाडी वेगाने त्यांच्या समोरून जाते तेव्हा त्यांना ती परकी वस्तूच वाटते व ते संरक्षणासाठी त्यांचा पाठलाग करू लागतात. रस्त्यावरील भटकी कुत्री ही एका विशिष्ट परिसराला स्वतःचा परिसर मानत असतात व त्या ठिकाणी ते मोकाटपणे फिरत असतात त्यामुळे जेव्हा एखादे वाहन त्या ठिकाणाहून जाते तेव्हा त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते व ते त्या गाडीचा पाठलाग सुरू करतात.
  2. माणसासोबत राहून कुत्रा हा सुद्धा समूह प्रिय प्राणी बनलेला असतो त्यामुळे जेव्हा तो एकटाच असतो किंवा त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नसते तेव्हा त्याला सुद्धा एकटेपणा जाणवतो. म्हणूनच जेव्हा एखादे वाहन त्या ठिकाणाहून जाते तेव्हा आपल्या भुंकण्याने आणि धावण्याने कुत्रा इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो.
  3. गाड्यांच्या लाईट आणि चाके त्यामुळे एक प्रकारची गती व ऊर्जा निर्माण होते. ज्याद्वारे कुत्र्यांमध्ये कुतुहल आणि भीती या दोन्ही भावना एकाच वेळी निर्माण होतात व ते  गाड्यांच्या चाका मागे धावतात व लाईट मुळे त्यांच्यामध्ये जी भीती निर्माण होते त्याद्वारे स्वतःचा बचाव करण्यासाठी गाड्यांचा पाठलाग करतात.