Home » होळीच्या दिवशी भांग का पितात, जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व…!
Infomatic

होळीच्या दिवशी भांग का पितात, जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व…!

होळीचा शुभ सण  देशभरात उत्साहात साजरा केला जातो.यंदा होळीचा सण १८ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.होळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो.दरवर्षी या दिवशी मोठ्या संख्येने लोक जमतात,रंग खेळतात,नाचतात,स्वादिष्ट पदार्थ खातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.दुसरीकडे,होळीचा सण भंग शिवाय अपूर्ण मानला जातो.या वेळी भांग चे सेवनही केले जाते.या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारे भांग चे सेवन करतात.यामध्ये भांग लस्सी,भांग पकोडे,भांग थंडाई आणि भांग गुज्या यांचा समावेश आहे.

भांग पिण्यामागचे धार्मिक महत्त्व…

असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेले विष शिवाने घशात जाऊ दिले नाही.हे विष खूप गरम होते.त्यामुळे शिवाला उष्ण वाटू लागले.शिव कैलास पर्वतावर गेले.विषाची उष्णता कमी करण्यासाठी शिवाने भांगाचे सेवन केले.भांग हे थंडगार मानले जाते.तेव्हापासून भगवान शिवाला भांग खूप आवडते. भगवान शंकराच्या पूजेदरम्यानही भांग वापरतात.भांग शिवाय शिवाची पूजा अपूर्ण आहे,असे मानले जाते.शिवपूजेत भांग अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात,असे सांगितले जाते.भांग सोबत दातुरा आणि बेलची पानेही दिली जातात.

होळीच्या दिवशी भांग का पितात ?

धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी भगवान शिव आणि विष्णू मैत्रीचे प्रतीक म्हणून भांग चे सेवन करतात. वास्तविक असे मानले जाते की भक्त प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिरण्यकशिपूला मारण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप घेतले होते.पण हिरण्यकशिपूचा वध केल्यावर तो संतापला.त्याला शांत करण्यासाठी भगवान शिवाने शरभ अवतार घेतला.होळीच्या दिवशी भांग चे सेवन करण्यामागे हेही एक कारण असल्याचे मानले जाते.प्रसाद म्हणून सेवन केले जाते.याशिवाय इतरही अनेक कथा लोकप्रिय आहेत.