Home » एखादे गाणे ऐकल्यावर आपण सतत ते गुणगुणत राहतो, त्यामागे देखील आहे शास्त्रीय कारण…!
Infomatic

एखादे गाणे ऐकल्यावर आपण सतत ते गुणगुणत राहतो, त्यामागे देखील आहे शास्त्रीय कारण…!

तुम्ही एक ते तीन या वयोगटातील लहान मुलांचे पालक असाल तर जॉनी जॉनी किंवा बाबा ब्लॅक शीप हे शब्द ऐकले तरीही पुढील गाणे आपल्या डोक्यात रुंजी घालू लागते व आपसूकच आपल्या ओठांवर येते व हेच कारण आहे की या गाण्यांना युट्युब वर आजही लाखोंच्या संख्येने व्ह्यू मिळतात. एखादे गाणे आपल्या ओठांवर दिवसभर येण्याचे व आपल्या डोक्यामध्ये सतत भिनभिणतत राहण्यामागचे कारण काय आहे तर या मागचे कारण म्हणजे इयरवर्म ही संज्ञा होय.

इयरवर्म म्हणजे एखादे गाणे आपल्या कानामध्ये किंवा आपल्या मेंदूत अर्थात डोक्यामध्ये अगदी घट्ट रुतून बसणे होय. म्हणजेच केवळ त्या गाण्याविषयी विचार केला किंवा त्या गाण्याचे काही शब्द आपल्या कानांवर पडले तरी ते गाणे वारंवार आपण गुणगुणायला लागतो. संपूर्ण जगभरातील जवळपास 90 टक्के लोकांना आठवड्यातून एकदा तरी इयरवर्मचा अनुभव आल्याचे सांगितले जाते.

इयरवर्म किंवा काही विशिष्ट गाणी वारंवार का गुणगुणली जातात याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून डर्हम विद्यापीठामध्ये अभ्यास केला गेला. या अभ्यासा अंतर्गत जवळपास 3000 व्यक्तींना शंभर अशी गाणी निवडण्यासाठी सांगितले गेले ज्या गाण्यांना वारंवार गुणगुणत राहिले जाते.

या गाण्यांचा अभ्यास केला असता काही समान गुणवैशिष्ट्ये इयरवर्म ही संज्ञा लागू होणाऱ्या गाण्यांना विभाजित करतात ते म्हणजे ज्या गाण्यांमध्ये नावीन्य आणि परंपरागतपणा या दोघांच्या मधील काहीतरी धागा जाणवतो अशी गाणी विशेषत्वाने वारंवार गुणगुणली जातात किंवा ज्या गाण्यांमध्ये अगदी उंच आणि अगदी खालच्या पातळीवरील नोट्स असतात अशी गाणी सुद्धा आपल्या जिभेवर रेंगाळतात.

तसेच काही लोकप्रिय गाण्यांच्या चालीशी साधर्म्य असलेली गाणी सुद्धा आपल्या मनात पटकन बसतात. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते आपल्यापैकी बहुतांश व्यक्तींचे विचार हे संपूर्ण दिवसभरात 40% इतक्या संख्येने विविध ठिकाणी संचार करत असतात व या आपल्या विचारांच्या संचाराच्या टप्प्यामध्ये जर एखाद्या गाण्याशी आपली नाळ जोडली गेली तर ते गाणे दिवसभर आपल्या तोंडामध्ये येत राहते व आपल्या विचारांमध्ये सुद्धा रुंजी घालते. 

एखादे गाणे आपल्या विचारांमध्ये किंवा तोंडामध्ये सतत रुजून बसण्याचा म्हणजे इयरवर्म चा कालावधी हा काही सेकंदापासून ते काही तासांपर्यंत असतो. मात्र काही व्यक्तींच्या बाबतीत हा कालावधी अगदी काही आठवड्यांचा किंवा महिन्यांचा सुद्धा असू शकतो व यामुळे त्यांचे कामामधील लक्ष विचलित होते व एकाग्रताही भंग पावते. म्हणून इयरवर्म या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी जोकोबोन्स्की या मानसशास्त्रज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत हे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

1. इयरवर्म पासून मुक्तता मिळवण्यासाठी च्युइंगम  खाण्याचे साधा व सोपा उपाय संशोधकांनी सुचवला आहे .एखादे लक्ष वेधून घेणारे गाणे किंवा जाहिरातीची जिंगल ऐकल्यानंतर च्युइंगम चघळले तर ती जिंगल किंवा ते गाणे आपल्या तोंडात येत नाही.

2. इयरवर्म पासून वाचण्यासाठी एखाद्या गाण्यामुळे आपले लक्ष विचलित होत आहे असे वाटले तर अगदी ठरवून याकडे दुर्लक्ष करावे व हे संदेश मेंदूपर्यंत गेल्यामुळे काही काळानंतर आपोआपच हे गाणे आपल्या विस्मृतीत जाते.

3. आपल्या देशाचे राष्ट्रगीत किंवा संबंधित गाण्याच्या पेक्षाही अधिक आवडीचे एखादे गाणे अशावेळी गुणगुणावे यामुळे इयरवर्मचा प्रभाव असलेले गाणे बाजूला पडते.

4. बहुतांश वेळा आपले कमी लक्ष किंवा कमी एकाग्रता असलेल्या टप्प्यावर इयरवर्मचा प्रभाव जास्त पडतो. म्हणूनच अशावेळी एखादा लेख वाचणे किंवा अन्य एखाद्या कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेणे हा उपाय प्रभावी ठरतो.

5. इयरवर्म ही संज्ञा लागू पडलेले गाणे म्हणजे काही ठराविक ओळी आपल्या मेंदूमध्ये अगदी घट्ट रुतून बसलेल्या असतात अशावेळी यावर उपाय म्हणजे ते संपूर्ण गाणे ऐकणे हा होय.