Home » कंगना राणावतचे वक्तव्य ऐकून अजित पवार संतापले,म्हणाले विधानं ऐकून ‘तळपायाची आग मस्तकात जाते’
News

कंगना राणावतचे वक्तव्य ऐकून अजित पवार संतापले,म्हणाले विधानं ऐकून ‘तळपायाची आग मस्तकात जाते’

पद्मश्री पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाचे प्रकरण जोर धरू लागले आहे.

कंगना राणावत हिचे विधान…

टाइम्स नाऊ च्या कार्यक्रमामध्ये कंगना राणावत म्हणाली १९४७ ला मिळालेले स्वतंत्र म्हणजे ‘भीक’.भारताला खरं स्वतंत्र मिळालं ते २०१४ नंतर.या विधानावर अनेक लोक तिच्यावर संतापले आहेत.

तसेच देशाच्या स्वातंत्र्याबाबत चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हीच्या वादग्रस्त विधानाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

अजित दादा यांनी कंगना राणावत हिच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा म्हणाले लोकांनी केलेले विधानं ऐकून ‘तळपायाची आग मस्तकात शिरते’.

अजित दादा पवार हे माध्यमांशी बोलताना लोकांनी काहीही बोलण्या अगोदर भान ठेवायला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खुप जणांनी बलिदान दिले.