Home » करोडो संपत्तीचे मालक आहेत NCB अधिकारी समीर वानखेडे, आर्यन खान प्रकरणात आहे मास्टरमाईंडचा आरोप!
News

करोडो संपत्तीचे मालक आहेत NCB अधिकारी समीर वानखेडे, आर्यन खान प्रकरणात आहे मास्टरमाईंडचा आरोप!

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर एन सी बी चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरात एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यांच्या विरोधात अमली पदार्थ प्रकरणी कारवाई केली आहे. अरमान कोहली, एजाज खान यांसारख्या अभिनेत्यांना तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने जेल मध्ये सुद्धा धाडले आहे. मात्र या सर्वांमध्ये आर्यन खानच्या अटके मध्ये प्रमुख भूमिका बजावणारे अधिकारी समीर वानखेडे हे आर्यनच्या अटकेनंतर प्रसार माध्यमांमध्ये सर्वत्र दिसून येत आहेत.

गेल्या वर्षभरात अमली पदार्थ प्रकरणी समीर वानखेडे यांनी बजावलेल्या कारवायांमुळे त्यांना सिंघम असेसुद्धा म्हटले जाऊ लागले होते. मात्र आर्यन खान च्या प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्यावरच खंडणीचे किंवा लाचखोरीचे आरोप केले जात आहेत.लाचखोरीचे आरोप लावले जात असतानाही समीर वानखेडे आपला तपास करत होते.

गोव्याला जाणाऱ्या क्रूज वर रेव पार्टी होणार होती व या पार्टीवर धाड टाकून समीर वानखेडे व त्यांच्या टीमने आठ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान मानल्या जाणा-या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होता. आर्यन खान च्या अटकेमुळे समीर वानखेडे प्रकाशझोतात आले.

आर्यन खानची अटक ही शाहरुख खान कडून मोठ्या रकमेची खंडणी उकळण्यासाठी चा पूर्वनियोजित कट होता असे आरोप समीर वानखेडेवर केले जात आहेत. समीर वानखेडे यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे व ते आपल्या कामामुळे सर्वत्र ओळखले जातात.आज आपण समीर वानखेडे यांच्या संपत्ती विषयी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

समीर वानखेडे हे 2008 साली आय आर एस अधिकारी बनले. सध्या त्यांचे वय 40 वर्षे असून इतक्या कमी वयामध्ये त्यांनी आपली ओळख बनवली आहे. समीर वानखेडे यांचे वडील सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत होते. समीर वानखेडे यांच्या संपत्तीचे मुल्य अंदाजे पाच ते सहा कोटी रुपये इतके आहे. एक आय आर एस अधिकारी म्हणून त्यांना विविध सुविधा केंद्र सरकारकडून मिळतात. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून उद्योजिका पण आहेत.

समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन करताना क्रांती यांनी असे म्हटले होते की समीर वानखेडे यांनी गेल्या वर्षभरामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कारवाईदरम्यान पकडले होते त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या तथ्यहीन आरोपांना सामोरे जावे लागत आहे.

हे पहिल्यांदाच नाही जेव्हा समीर वानखेडे यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींसौबत पंगा घेतला आहे. या अगोदर समीर वानखेडे हे विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यावेळीही त्यांनी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आपल्या कर्तव्याचा धाकदपटशा दाखवला आहे.