Home » चित्रपट सृष्टीत शोककळा! लोकप्रिय कन्नड अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे निधन…
News

चित्रपट सृष्टीत शोककळा! लोकप्रिय कन्नड अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे निधन…

लोकप्रिय कन्नड अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे सोमवारी निधन झाले आहे.मृ’त्यु’समयी त्यांचे वय 83 वर्षांचे होते.वृद्धापकाळाने त्या काही काळापासून आजारी होत्या.त्यांच्या निधनाची बातमी कळताच कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे.भार्गवी नारायण यांच्या नातीने त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले आहे.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

भार्गवी नारायण यांच्या पश्चात त्यांची चार मुले आहेत.त्यांनी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट बेलावडी नंजुन्दैया नारायण यांच्यासोबत विवाह केला होता.भार्गवी नारायण यांच्या मुलाने त्यांच्या निधनाबद्दल अधिक माहिती दिली आहे.त्यांनी असे सांगितले आहे की त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह सेंट जोन्स रुग्णालयाला दान केला जाईल व त्यांच्या डोळ्यांना नेत्रधाम संस्थेस दान केले जाईल.भार्गवी नारायण यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

एराडु कानासू,हंथकाना सांचू ,पल्लवी अनुपल्लवी,वंशवृक्ष,प्रोफेसर हुचुरया और बा नल्ले मधुचंद्रके हे काही चित्रपट त्यांचे खूप गाजले होते .प्रसिद्ध कन्नड मालिका मुक्ता मध्येही त्यांनी अभिनय केला होता.तसेच सहाशेहून अधिक नाटकांमध्ये त्यांनी काम केले होते.रेडिओ कलाकार म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती.इतकेच नव्हे तर भार्गवी नारायण या उत्कृष्ट लेखिकाही होत्या.2012 साली नानू,भार्गवी हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध झाले होते.त्यांच्या आत्मकथनास कर्नाटक साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.