Home » दररोज एक पेरु खाल्ल्याने होतात हे फायदे, एकदा नक्की वाचा…
News

दररोज एक पेरु खाल्ल्याने होतात हे फायदे, एकदा नक्की वाचा…

आपल्या आहारामध्ये फळांचे सेवन अवश्य करावे असे वारंवार सांगितले जाते.आपल्याकडून निरनिराळ्या फळांचे सेवन केले जाते व सर्व फळांचे आपल्या शरीरात अनेक फायदे असतात .पेरू हे फळ खूप आवडीने खाल्ले जाते .पेरू हे फळ चवीसाठी तर खूपच चविष्ट असते पण यामध्ये पोषणमूल्य सुद्धा खूप जास्त असतात.मुळतः दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू चा उदय झाला व पोर्तुगीजांनी भारताला या फळाची सर्वप्रथम ओळख करून दिली.औ पेरूच्या सेवनामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढणे हे खूप आवश्यक आहे. आवळा या फळाच्या पाठोपाठ पेरूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात आहे असे मानले जाते.पेरूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते. क जीवन सत्वामुळे  रोगप्रतिकारक शक्ती वाढून सर्दी-खोकला यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. पेरूच्या सेवनासाठी पेरू कापल्यानंतर लगेचच सेवन करावे.कारण हवेमध्ये यातील पोषणद्रव्ये लगेच कमी होतात.उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे पेरु,खरबुज,टरबूज यांचे संमिश्र पेय बनवून ते घ्यावे.

मधुमेह असलेल्या व्यक्तीला काही ठराविक फळांचे सेवन करण्यास परवानगी दिली जाते. संत्री-मोसंबी यांसोबतच पेरूचे सेवन मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते. पेरूमध्ये असलेले मुबलक पेफ्टीनमुळे शरीरातील ग्लुकोज आणि रक्ताची पातळी यांच्यामध्ये संतुलन राहते मात्र यासाठी पेरूच्या वरची साल न काढता पेरू खावा. यामुळे जास्तीत जास्त फायबर आपल्या शरीराला मिळतात .मधुमेह असलेल्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात घेणे खूप आवश्यक आहे की पेरु कापूनच सेवन करावे त्याचे ज्यूस बनवून देऊ नये कारण पेरूच्या रसामध्ये कार्बोदके आणि फँट्स यांचे अतिरिक्त प्रमाण असते व यामुळे रक्तातील साखर आणि ग्लुकोज यांचे असंतुलन निर्माण होते मधुमेह असलेल्या व्यक्तींना पेरूच्या झाडाच्या पानांचे सेवन करण्यासही सांगितले जाते.

सध्याच्या काळामध्ये धकाधकीचे जीवन आणि काही अंशी अनुवंशिक घटकांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.अशा परिस्थितीमध्ये आपल्या आहारामध्ये काही बदल करणे आवश्क ठरते. पेरू मध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट, लायकोपेन आणि क जीवनसत्वाचा समृद्ध स्त्रोत यामुळे कॅन्सरच्या फैलावास कारणीभूत ठरणा-या पेशींवर प्रतिबंध घातला जातो. कर्करोगाच्या  झपाट्याने वाढणाऱ्या पेशींवर पेरूच्या सेवनामुळे आळा घातला जातोच मात्र शरीरातील पेशींना होणारी हानी सुद्धा रोखली जाते.

कॅन्सरच्या उपचार घेणाऱ्या रुग्णांना निर्माण शिसारी,मळमळ, उष्णता वाढणे, पचन कार्य बिघडणे,घशाला सूज येणे शरीरातील उष्णता वाढणे इत्यादी समस्यांवर पेरूच्या ज्यूसचे सेवन करणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. मात्र पेरूच्या ज्यूसचे सेवन कॅन्सरच्या रुग्णांनी करताना एक काळजी घेतली पाहिजे की पेरुचा ज्यूस मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते आणि कॅन्सरच्या पेशी व साखर यांच्या एकत्रित प्रक्रियेमुळे हा आजार अधिकच बळावू शकतो त्यामुळे शक्यतो शुगर फ्री ज्यूस घेण्यास प्राधान्य द्यावे.

 वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये योग्य त्या पोषणमूल्य यांनी युक्त पदार्थांचा समावेश करणे खूप आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी भरपूर फायबर आणि भरपूर प्रथिने असलेला आहार घ्यावा. पेरू मध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रथिने असतात व अगदी कमी प्रमाणात फँट असतात त्यामुळे दररोज एका पेरूचे सेवन हे वजन कमी करण्यासाठी आवश्य करावे. पेरु खाते वेळी त्यामधील बिया काढून टाकू नये कारण पेरूच्या बियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते व किमान एका पेरूचे सेवन केल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होऊन अतिरिक्त खाण्यास आळा घातला जातो.

पेरू या फळामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट यामुळे शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते आणि वजन कमी करण्या मध्ये सुद्धा याचे सहाय्य मिळते.वजन आणि शर्करेचे शरीरातील प्रमाण संतुलित राखल्यामुळे पेरू हे फळ हृदयाशी निगडित समस्यांवर सुद्धा अतिशय प्रभावी असा उपाय मानले जाते.पेरूमध्ये असलेल्या फायबर्स मुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत पणे चालतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील अडथळे दूर केले जातात व हृदयात व छातीत जळजळ होण्याचे प्रमाणही  कमी होते. पेरुमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे हृदयाचे ठोके नियमितपणे चालण्यास मदत मिळते.

पेरू मध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणातील फायबर यामुळे पचनास सही साहाय्य मिळते. पेरूच्या नियमित सेवनामुळे बद्धकोष्ठतेशी निगडित समस्या दूर होतात. वय वाढणे किंवा चेहऱ्यावर वय वाढण्याच्या खुणा निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आपण थोपवू शकत नाही मात्र पेरुमध्ये असलेल्या जीवनसत्व आणि लायकोपेन यांच्या सेवनामुळे चेहर्‍यावर पडणाऱ्या सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. पेरुमधील क जीवनसत्वामुळे शरीरातील त्वचेच्या  आणि त्वचेखाली असलेल्या सुरक्षेच्या थरासाठी आवश्यक घटकाच्या निर्मितीस चालना मिळते त्यामुळे  पेरूच्या सेवनामुळे त्वचेला  घट्टपणा प्राप्त होतो.