Home » नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई नुकतीच अडकली विवाहबंधनात…
News

नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई नुकतीच अडकली विवाहबंधनात…

मुलींच्या शिक्षणाची समर्थक आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईने ९ नोव्हेंबर रोजी उशिरा ट्विट केले की, तिने असर मलिकशी लग्न केले आहे.माझ्या आयुष्यातील हा खूप मौल्यवान दिवस असल्याचे तिने सांगितले. मलालाने बर्मिंगहॅम येथील तिच्या घरी लग्नसोहळा साजरा केला. मलालाशी लग्न करणारा असर मलिक कोण आहे हे जाणून घेऊया.

असर मलिकच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार, तो एक उद्योजक आहे. सध्या ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे महाव्यवस्थापक आहेत. क्रिकेटमधील त्याची आवड त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येते.असर क्रिकेटशी निगडीत आहे.त्याने पाकिस्तान टी-२० लीगमधील मुलतान सुलतान संघासाठी खेळाडू विकास कार्यक्रम तयार केला आहे.असर २०२० पासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत काम करत आहे.पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार,असरला स्ट्रीट क्रिकेटमध्ये खूप रस आहे. तो स्ट्रीट क्रिकेटमधून प्रतिभा मिळविण्यासाठी देखील ओळखला जातो.

असरच्या अभ्यासाबद्दल सांगायचे तर,त्याने त्याचे शालेय शिक्षण लाहोरमधून पूर्ण केले आहे. लाहोरच्या एचिन्सन कॉलेजमधून शिक्षण घेतले. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्समधून अर्थशास्त्रची पदवी प्राप्त केलेली आहे.

मलाला ही जगभरातील मुलींच्या शिक्षणाची पुरस्कर्ते आहे. वयाच्या ११ व्या वर्षी तीच्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. शाळेतून परतत असताना हा हल्ला झाला. प्रदीर्घ उपचारानंतर ती बरी झाली. मुलींच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी लढणारी मलाला दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे.