Home » ममता बॅनर्जी यांनी सांगितला भाजपाला पराभूत करण्याचा फॉर्म्युला…
News

ममता बॅनर्जी यांनी सांगितला भाजपाला पराभूत करण्याचा फॉर्म्युला…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभर दौरे करत आहेत आणि बिगर-काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.दरम्यान, बुधवारी मुंबईत सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची योजनाही सांगितली.

सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव करणे सोपे जाईल,असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.अशा प्रकारे आगामी काळात आणखी काही प्रादेशिक पक्ष जोडण्याचा त्यांचा डाव असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.त्यामुळे भाजपाला पराभूत करायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना एकत्र यावं लागेल.ममता बॅनर्जी यांनी मंगळवारीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती.

ममता बॅनर्जी याआधी गोव्यालाही गेल्या होत्या,जिथे त्यांनी माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना टीएमसीमध्ये सामील केले होते.याशिवाय नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी बिहार काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद आणि हरियाणाचे नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशोक तंवर यांनाही पक्षाचे सदस्यत्व दिले होते.

जेडीयूचे पवन वर्मा आणि माजी ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा हे दोघे आता टीएमसीचा भाग बनले आहेत.अशा प्रकारे तृणमूल काँग्रेसने आपला प्रचार सातत्याने पुढे नेला आहे. दुसरीकडे,भाजपविरोधात काँग्रेसला कमकुवत म्हणत सातत्याने हल्लाबोल केला जात आहे.ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही भाजपवर उघडपणे हल्लाबोल केला आहे.