Home » मराठी चित्रपट सृष्टीला शोककळा ‘या’ मराठी अभिनेत्री चे दुःखद निधन…
News

मराठी चित्रपट सृष्टीला शोककळा ‘या’ मराठी अभिनेत्री चे दुःखद निधन…

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मराठी अभिनेत्रीचे मुंबई मधील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे.माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे .त्यांच्या पश्चात त्यांचे पती आणि एक विवाहीत मुलगी आहे.त्यांचे निधन कोरोनामुळे झाल्याची माहिती मिळत आहे.

माधवी गोगटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही सिरीयल, चित्रपट आणि नाटकांमध्येकाम केले आहे. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची अत्यंत गाजलेली मराठी नाटकं आहेत. ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय झाली होती.

माधवी गोगटे यांनी मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिका मध्ये काम केलेले आहे.