Home » महाराष्ट्राच्या राजकारणातील लढवय्या हरपला! शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा.एन डी पाटील यांचे निधन…
News

महाराष्ट्राच्या राजकारणातील लढवय्या हरपला! शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा.एन डी पाटील यांचे निधन…

महाराष्ट्राच्या चळवळींमध्ये एक लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा.एन डी पाटील यांचे आज निधन झाले आहे.मृ’त्यु’समयी त्यांचे वय 93 वर्षांचे होते.कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले आहे.तब्येती मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या ठिकाणी ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्यांची तब्येत अधिकच खालावत गेली.

प्रा.एन डी पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकारण व शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे.प्रा.एन डी  पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील ढवळी या गावी झाला होता.त्यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील होते.सुरुवातीपासूनच वैयक्तिक जीवनातही एन डी पाटील यांना शिक्षणाप्रती ओढ होती व यातूनच त्यांनी स्वतः उच्चविद्याविभूषित होण्यावर भर दिला व त्यांचे शिक्षण हे एम ए एल एल बी झाले.पुणे विद्यापीठातून त्यांनी एल एल बी चे शिक्षण घेतले होते.

त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग अध्यापन क्षेत्रामध्ये केला.शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्था व शिवाजी विद्यापीठांमध्ये त्यांनी काही काळ अध्यापक म्हणून कार्य केले. राजकारणामध्ये ही त्यांना रूची होती यामुळे त्यांनी 1948 साली शेतकरी कामगार पक्षा मध्ये सहभाग घेतला. याठिकाणी आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ते सरचिटणीस म्हणून नियुक्त झाले.राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत धडाडीने ते आपली घोडदौड पुढे चालू ठेवणारे नेते म्हणून परिचित होते.

तब्बल 17 वर्षे एन डी पाटील यांनी कोल्हापूरचे प्रतिनिधित्व विधानसभेवर केले. त्यांनी सहकार मंत्री म्हणूनही धुरा सांभाळली होती.राजकारणामध्ये येऊनही गोरगरीब वंचित आणि शोषितांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्याची त्यांची नेहमीच तयारी असे .प्राध्यापक एन डी पाटील यांनी सीमाप्रश्न समितीवरही कार्य केले होते व म्हणूनच सीमा भागातील स्थानिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी दीर्घकाळ लढा दिला होता.

अध्यापनाचे कार्य करत असताना होतकरू व गरीब घरातील मुलांसाठी त्यांनी कमवा व शिका यांसारख्या योजनांवर भर दिला होता.तसेच सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबवण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला होता.

प्राध्यापक एन डी पाटील यांनी दिलेल्या झुंजीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.त्यांपैकी काही पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार