Home » मुंबईतील घटस्फोट ट्रॅफिक जाममुळे,अमृता फडणवीस यांचा अनोखा दावा…
News

मुंबईतील घटस्फोट ट्रॅफिक जाममुळे,अमृता फडणवीस यांचा अनोखा दावा…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज एक अनोखा दावा केला आहे.त्यांच्या मते मुंबईतील तीन टक्के घटस्फोट हे मुंबईतील रस्त्यांवर होणा-या ट्राफिक जाम मुळे घडून येतात.पत्रकारांसोबत मुंबईतील रस्त्यांची दुरावस्था आणि ट्रॅफिक जाम बद्दल बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे व त्यांच्या या विधानाला आजच्या दिवसभरातील सर्वात बेताल वक्तव्य म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना असे म्हटले की मी एक सामान्य स्त्री म्हणून बोलते आहे या भूमिकेतून तुम्ही बघा. थोड्यावेळासाठी तुम्ही हे विसरून जा की मी देवेंद्र फडणवीस या माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे.मुंबई ट्राफिक जाम चा अनुभव मी स्वतः घेतला आहे.मुंबईतील वाढत्या घटस्फोटांपैकी तीन टक्के घटस्फोट हे ट्रॅफिक जाम मुळे घडतात.कारण लोक आपल्या कुटुंबाला ट्राफिक जाममुळे पुरेसा वेळ देऊ शकत नाही.आपण स्वतः या ट्राफिक जाम मुळे आणि खड्ड्यांमुळे त्रस्त ‌आहोत असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

अमृता फडणवीस यांच्या या विधानाला तथ्य हीन असल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे व प्रियंका चतुर्वेदी यांनी या विधानावर टीका करताना असे म्हटले आहे की हे अतिशय बेताल व बेजबाबदार वक्तव्य असून बेंगलोर मधील लोकांनी हे विधान वाचू नये.अमृता फडणवीस यांच्यावर प्रियंका चतुर्वेदी यांच्याप्रमाणेच अन्य सुदधा काही युजर्सनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे व त्यांच्या या विधानाशी निगडित काही मिम्स व जोक सुद्धा बनवले आहे.