Home » ‘या’ कारणामुळे ‘हिना खानला’ ‘सिद्धार्थच्या’ अंत्ययात्रेमध्ये उपस्थित राहता आल नाही!
News

‘या’ कारणामुळे ‘हिना खानला’ ‘सिद्धार्थच्या’ अंत्ययात्रेमध्ये उपस्थित राहता आल नाही!

सिद्धार्थ शुक्ला चा निधनानंतर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता ठरल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला च्या लोकप्रियतेमध्ये खूपच वाढ झाली होती. बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये गौहर खान आणि हिना खान यांच्यासह सिद्धार्थ पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. या सिझनमध्ये गौहर खान आणि हिना खान सोबत सिद्धार्थ चे खूपच मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते.

सिद्धार्थ शुक्ला च्या निधनानंतर गौहर खानने त्याच्या कुटुंबियांशी त्याच्या निवासस्थानी जाऊन लगेच भेट घेतली मात्र हिना खान सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या निवासस्थानी किंवा अंत्यसंस्काराच्या वेळी दिसली नाही.यासंदर्भात एका चाहत्याने हिना ला प्रश्न विचारला कि ती सिद्धार्थच्या अंत्ययात्रेमध्ये का आली नाही.  हिना खान सिद्धार्थ शुक्ला ची अतिशय जवळची मैत्रीण असूनही ती त्याच्या अंत्ययात्रेला का उपस्थित राहिली नाही हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला होता.

याला खुद्द हिनाने उत्तर दिले की ती सध्या मुंबईमध्ये नाहीये त्यामुळे ती सिद्धार्थच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहू शकली नाही. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर लगेचच हीनाने एक पोस्ट सुद्धा शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने असे म्हटले होते की जेव्हा आयुष्यामध्ये आपल्याला कटू-गोड प्रसंग अचानक पणे अनुभवण्यास मिळतात तेव्हा आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजू लागते.आयुष्य खूपच अनपेक्षितपणे आपल्या समोर येते.

सिद्धार्थच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगांमध्ये सावरण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना तिने केली आहे. हिनाने सिद्धार्थच्या मृत्यूमुळे आपण खूपच दुःखी असल्याचेही  म्हटले आहे.