Home » ‘या’ सुंदरीला बघताच प्रेमात वेडे झाले होते व्लादिमीर पुतीन…!
News

‘या’ सुंदरीला बघताच प्रेमात वेडे झाले होते व्लादिमीर पुतीन…!

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून युद्धाच्या घडामोडी खूप जोरदारपणे चालू आहेत.या युद्धजन् स्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख चांगलेच चर्चेत आहेत.युक्रेनचे राष्ट्रप्रमुख वोलोदिमिर जेलेंस्की त्यांच्या धडाडी आणि निर्भिड बाणा मुळे प्रसिद्ध आहेत तर रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लामिदीर पुतीन हे शत्रूला पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकण्याच्या त्यांच्या अट्टाहासाने चर्चेत आहेत.

व्लादिमीर पुतीन हे त्यांचे राहणीमान,फिट शरीर यामुळे नेहमीच आकर्षणाचा विषय असतात.व्लादिमीर पूतीन यांचे वैयक्तिक आयुष्य हे विविध रंजक गोष्टींनी भरलेले आहे.यांच्या कथित प्रेयसी बद्दल अनेकदा चर्चा होते.त्यांची प्रेयसी एलीना कबाएवा पूर्वाश्रमीची ऑलिम्पिक विजेती जिमनॅस्टिक खेळाडू आहे.व्लामिदीर पुतीन हे 69 वर्षांचे आहेत तर एलिना चा जन्म हा 1983 साली उज्बेकिस्तान मध्ये जो पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग होता या ठिकाणी झाला.

2000 साली सिडनी येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक मध्ये एलिनाने कांस्य पदक पटकावले तर 2004 साली पार पडलेल्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.पुतीन यांच्यापासून एलिनाला दोन जुळी मुले सुद्धा आहेत असेही सांगितले जाते.एलिनाने 14 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल तर एकवीस वेळा युरोपियन चॅम्पियनशिप मेडल आपल्या नावावर केले आहे. गेल्या काही वर्षांपासून एलीना राजकारणात सुद्धा सक्रिय आहे.

एलिना आणि व्लादिमीर पुतिन यांच्या मधील कथित प्रेमसंबंध सर्वात अगोदर 2008 साली समोर आले.यानंतर 2013 साली पुतीन यांचा त्यांच्या पत्नी सोबत घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा एकदा एलिना आणि पुतीन यांच्या मधील प्रेम संबंधांच्या चर्चा रंगू लागल्या.2018 साली एलिना गर्भवती असल्याची बातमी आली व ही मुले पुतीन यांची असल्याचे सांगितले जाऊ लागले.2019 साली एलिनाने जुळ्या मुलांना जन्म दिला.

About the author

Being Maharashtrian