Home » यूक्रेन मधील ‘या’ महिलेला प्रचंड घाबरत असत पुतीन, जाणून घ्या कोण आहे ही महिला…!
News

यूक्रेन मधील ‘या’ महिलेला प्रचंड घाबरत असत पुतीन, जाणून घ्या कोण आहे ही महिला…!

पुन्हा एकदा दोन देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे.रशिया आणि युक्रेन हे दोन देश गेल्या दहा दिवसांपासून एकमेकांसोबत युद्ध करत आहेत.रशिया युक्रेन वर सातत्याने हल्ले करत आहे यामुळे युक्रेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी झाली आहे.या युद्धामध्ये कोणत्याही प्रकारचा मध्यस्थी चा तोडगा निघत नाही.अमेरिका व अन्य देश तटस्थपणे हे युद्ध पाहत असल्याचे दिसून येते.रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लामिदीर पुतीन हे कोणत्याही महासत्तेला घाबरत नाही असे चित्र निर्माण झाले आहे.

रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतिन सुद्धा युक्रेनच्या एका महिलेला प्रचंड घाबरत असत व ही महिला अगदी खुलेआमपणे रशियाला नेहमीच आवाहन देत असे.ही महिला कोण होती व आता कुठे आहे हे आपण समजून घेऊया.युक्रेन मधील ही महिला म्हणजे युक्रेन ची पहिली राष्ट्रप्रमुख युलिया होय.युलिया या  खऱ्या अर्थाने युक्रेनची कमान सांभाळणाऱ्या राष्ट्रप्रमुख ठरल्या होत्या.युलिया या इतक्या नीडर होत्या की त्या रशियाला अगदी खुलेआमपणे आवाहन देत असत.युक्रेनला ला समर्थ व एक महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते.

युक्रेन ला नाटोच्या समूहामध्ये सदस्य म्हणून सहभागी करण्याचे त्यांचे ध्येय होते.पश्चिमी देशांसोबत युलिया यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते.नाटोच्या सदस्य झाल्यामुळे अन्य कोणत्याही देशाची  युक्रेन कडे मान वर करून बघण्याची हिंमत होणार नाही अशी त्यांची धारणा होती.यूलिया दोनवेळा युक्रेन च्या राष्टृरप्रमुख पदी विराजमान झाल्या.2005 ते 2007 आणि 2010 साली त्या पुन्हा एकदा युक्रेनच्या पंतप्रधान पदी नियुक्त झाल्या.युलिया यांनी नेहमीच रशियाला एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडले.

त्या नेहमीच युद्धासाठी तयार असत.यामुळेच रशिया व पुतीन यांना दबून असतात.रशियाला एक इंच जमीन सुद्धा देण्यास त्यांची तयारी नव्हती.युलिया केवळ युक्रेनच्या  राष्ट्रप्रमुख नव्हत्या तर देशातील आघाडीच्या उद्योजिका सुद्धा होत्या.त्यांचा गॅसचा खूप मोठा व्यापार होता.शूर राष्ट्रप्रमुख असलेल्या युलिया यांच्या कारकिर्दीचा शेवट भ्रष्टाचाराच्या आरोपांनी झाला.राष्ट्रप्रमुख पदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.

या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला व तत्कालीन राष्ट्रप्रमुख व्हिक्टर यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली.जवळपास तीन वर्षे युलिया तुरुंगात होत्या व या कालावधीत त्यांना प्रचंड त्रास ही देण्यात आला.सध्या युक्रेन वर रशिया हर एक प्रकारचे दडपण आणत आहे,हल्ले करत आहे.युक्रेन मधील सरकार हतबल झाल्याचे दिसून येते.रशियाचा मानस युक्रेन मधील सरकार उलथवून टाकणे व युक्रेन मधील सत्ता सैन्याच्या ताब्यात देणे आहे असे सांगितले जाते.