Home » राष्ट्रवादीलाचं निवडून दिलं तर १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देतो,अजित पवार यांचं विधान…
News

राष्ट्रवादीलाचं निवडून दिलं तर १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देतो,अजित पवार यांचं विधान…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लातूर जिल्यामधील औसा नगर पालिकेमध्ये केलेले विधान चांगलेच चर्चेत आहे.येथील नगरपालिकेच्या विकासकामांच्या शुभारंभासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत असतांना ते म्हणाले,नगरपालिकेला १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल परंतु एका अटीवर.

औसा नगरपालिकेमध्ये जर पुन्हा राष्ट्रवादीलाच निवडून दिलं तर हा निधी तुमच्याकडे येईल.त्यांनी केलेले हे विधान सध्या खूपच चर्चेत आहे.उपमुख्यमंत्री या पदावर असणाऱ्या व्यक्तीने असे विधान करणे गैर आहे असे काहींचे मत आहे.

कार्यक्रमात बोलतांना अजित पवार म्हणाले,”औसा नागरपालिकेमधील राष्ट्रवादीच्या पॅनलला म्हणजे अफसर शेख यांना निवडून दिले तर मी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल,हा माझा शब्द आहे.”

त्यावेळी ते असे देखील म्हणाले की,देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली तरी देखील लोक उघड्यावर शौचास बसतात ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.स्वच्छता अभियानामध्ये पारितोषिक मिळून चालणार नाही,त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.त्यासाठी जनतेने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे आव्हान देखील दिले.

या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार सतीश चव्हाण,माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.