Home » संजय राऊत यांनी आरोप केलेला ‘हा’ दूध वाला नक्की आहे तरी कोण?
News

संजय राऊत यांनी आरोप केलेला ‘हा’ दूध वाला नक्की आहे तरी कोण?

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्रातील सत्तेच्या काळामध्ये पंचवीस  हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.तसेच ईडी सारख्या संस्थांना हाताशी धरून मुंबईतील बांधकाम कंत्राटांमध्येही तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.यावेळी संजय राऊत यांनी यावेळी ईडी मधील काही अधिकारी,महाराष्ट्र आतील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार,व हरियाणा मधील एका दूध व्यावसायिकावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

हरियाणामधील एस नरवर या दूध व्यावसायिकावर त्यांनी आरोप केले आहेत‌ त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असे म्हटले आहे की तुम्ही एस नरवर या दूध वाल्याला ओळखता का ,हा हरियाणामधील दूध वाला असून इतक्या कमी कालावधीत सात हजार कोटी रुपयांचा तो कसा मालक बनला याची चौकशी व्हायला पाहिजे असे म्हटले आहे.महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार असताना या माणसाचे महाराष्ट्र मध्ये येणे-जाणे होते व त्याच्याकडे असलेली संपत्ती ही कोणाचा पैसा आहे असा सवालही त्यांनी विचारला आहे.एस नरवर या व्यवसायिकाकडे असलेले सात हजार कोटींपैकी साडेतीन हजार कोटी हे महाराष्ट्र मधून गेलेले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी असेही म्हटले आहे सर्वात मोठा घोटाळा हा महा आयटीमध्ये झाला असून या घोटाळ्यामध्ये सामील असलेला अमोल काळे हा सध्या कुठे फरार आहे याची चौकशी केली पाहिजे.ही सर्व माहिती ईडीकडे आहे मात्र ईडी ला सुद्धा भाजपा सरकारने महाराष्ट्र,पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये वेठीस धरल्याचे त्यांनी म्हटले आहे.राऊत यांच्या या पत्रकार परिषदेच्या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सेना भवनच्या बाहेर जमा झाले होते व या पत्रकार परिषदेची चर्चा खूप दिवसांपासून केली जात होती.