Home » ‘समीर वानखेडेंच्या’ अडचणीत वाढ, मुलावर झालेल्या कारवाई नंतर ‘शाहरुख खान’ उचलणार ‘हे’ मोठे पाऊल!
News

‘समीर वानखेडेंच्या’ अडचणीत वाढ, मुलावर झालेल्या कारवाई नंतर ‘शाहरुख खान’ उचलणार ‘हे’ मोठे पाऊल!

मुंबई उच्च न्यायालयाने गाजलेल्या आर्यन खान आणि अन्य दोघांच्या कथित अमली पदार्थ सेवन प्रकरणी व अमली पदार्थांच्या व्यापारविषयक कट अआखल्याप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान व अन्य तिघांच्या अटके संदर्भात व जामीन संदर्भात तपशीलवार विश्लेषण असलेली प्रत जारी केली आहे व यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट,व मुनमुन धमेचा जवळ अमली पदार्थांचे सेवन केल्याचा किंवा अमली पदार्थांचे सेवन करण्यासंदर्भात कट केल्याचा कोणताही सकृतदर्शनी  पुरावा एनसीबी सादर करू शकलेले नाही असे म्हटले आहे.

यामुळे आता शाहरुख खान चे चाहते शाहरुख खानने या सर्व प्रकरणांमध्ये बाळगलेले मौन सोडून काहीतरी कारवाई करावी अशी अपेक्षा करत आहेत. मात्र यामुळे आर्यन खान प्रकरणांमध्ये तपास करणारे एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये निश्चितच वाढ होऊ शकते.

शाहरुख ला त्याच्या कायदेविषयक टीमने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.समीर वानखेडे यांनी आर्यन खान व अन्य तिघांना अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी क्रूज वरील पार्टी मधून ताब्यात घेतले होते व त्यांनी केलेल्या दाव्यामुळे आर्यन खान हा जवळपास तीन आठवडे आर्थर रोड जेलमध्ये होता.

मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान मुनमुन धमेचा व अरबाज मर्चंट यांना अंमली पदार्थांचे सेवन करणे व अमली पदार्थांचे सेवन करण्यासंदर्भात कट करणे या आरोपांखाली करण्यात आलेली अटकेची कारवाई हीच मुळात सदोष असल्याचे म्हटले आहे. यामध्ये तपासात अनेक त्रुटी असल्याचेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे.

या तिघांना जेव्हा क्रूज वरून ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्यांची अमली पदार्थांचे सेवन केले आहे कि नाही यासाठीची आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली नव्हती. तसेच त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते मात्र यामधील व्हाट्सअप चॅट वरून किंवा कॉल वरून कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. या तिघांना केवळ ते एकाच वेळी एकाच ठिकाणी आढळल्यामुळे अमली पदार्थांचे सेवन करण्याचा कट रचत आहेत असे आरोप करणे हे चुकीचे आहे असे सुद्धा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणामध्ये सर्वच बाजूंनी योग्य तो तपास करण्याची मागणी जोर धरत होती.राजकीय क्षेत्रातून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व खोटे जात प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी मिळवण्याचे आरोप केले आहेत.तसेच आर्यन खानला अटक करण्याचा पूर्वनियोजित कट करण्यात आल्याचेही आरोप समीर वानखेडेंवर केले जात आहेत. या सर्व आरोपांना लक्षात घेऊन समीर वानखेडेंकडून या प्रकरणाचा तपास सध्या काढून घेण्यात आला आहे व त्यांची खाते अंतर्गत चौकशी सुद्धा सुरू आहे.

सध्या समीर वानखेडे व त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर जातीवरून करण्यात आलेले आरोप कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत व यामध्ये आता शाहरुख खान आपल्या मुलाला खोट्या आरोपात गोवल्या याप्रकरणी समीर वानखेडें वर काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.