Home » कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं संतापजनक विधान; ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट’
News

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं संतापजनक विधान; ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट’

बंगळुर इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.यामुळे सगळ्या परिसरामधील शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे.या घटनेनंतर शिवप्रेमींनी आक्रमक होऊन काही ठिकाणी रस्ते बंद केले आहेत आणि दगडफेक देखील केली आहे.

या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरुवारी रात्री बंगळूर मधील सदाशिवनगरातील महाराजांच्या पुतळ्यावर काळा डाग टाकून पुतळ्याचा अवमान केला.या घटनेमुळे शिवभक्तांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

बंगरूळमधील घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वादग्रस्त विधानं केलं आहे,‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि अगदी छोटी गोष्ट आहे अशा छोट्या गोष्टीसाठी दगडफेक करणं शांतता भंग करणं ह्या चुकीच्या गोष्टी आहे’ असे बसवराज बोम्मई म्हणाले.यांच्या या वक्तव्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक चांगलेच संतापले आहे.

बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण आणखी गरम झाले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे,त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न अशा गोष्टी होत आहे यावर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.