Home » क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर सोबत लता दिदींचे होते विशेष नाते…
News

क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर सोबत लता दिदींचे होते विशेष नाते…

प्रसिद्ध गायिका व भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज दुःखद निधन झाले आहे.वयाच्या 92 व्या वर्षी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला.लता मंगेशकर यांचा आवाज ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत.लता मंगेशकर यांना गायना सोबतच क्रिकेट विषयी विशेष आवड होती.त्या क्रिकेटचे सामने आवर्जून पहात असत व त्यासंदर्भात आपले मत सुद्धा नोंदवत असत.क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबत तर त्यांचे विशेष नाते होते.

सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांना आपल्या आईप्रमाणे मानत असत.लता मंगेशकर यांना सुद्धा सचिन आपल्या मुलासारखाच वाटत असे.लता मंगेशकर यांनीही सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेकदा जाहीर रित्या बोलूनही दाखवले होते व सचिनने सुद्धा अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी लतादीदीं बद्दलचा आदर व सन्मान बोलून दाखवला होता.

2014 साली सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले पण त्या अगोदर अनेकदा लताजींनी सचिनला हा पुरस्कार मिळावा अशी इच्छा बोलून दाखवली होती.2010 साली लताजींनी असे म्हटले होते की माझ्या मते सचिन हा या पुरस्काराचा खरा मानकरी आहे कारण त्यांनी जे देशासाठी केलेले आहे ते खूप कमी लोक करू शकतात.सचिनला मी माझा मुलगा मानते व त्याच्यासाठी नेहमी एखाद्या आईप्रमाणे मी प्रार्थना करत असे त्या सांगत असत.

जेव्हा सचिन ने सर्वात प्रथम त्यांना आई अशी हाक मारली होती त्या क्षणी त्या अतिशय भावनिक झाल्या होत्या व सचिन अशी हाक मारेल असे मला अपेक्षित नव्हते असेही त्यांनी सांगितले.सचिन तेंडुलकरचा जन्म दिवस व लता मंगेशकर यांच्या वडिलांची पुण्यतिथी 24 एप्रिल या एकाच दिवशी येते या संदर्भातही त्या नेहमी आठवण सांगत असत.सचिन ने क्रिकेट विश्वातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर नवीन पिढीतील विराट कोहली हा लताजींचा आवडता खेळाडू होता.इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने द्विशतक झळकावले नंतर लताजींनी त्याला एक गाणे समर्पित केले होते.