Home » चित्रपट सृष्टी वर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
News

चित्रपट सृष्टी वर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

मराठी चित्रपट सृष्टी साठी एक दुःखद बातमी समोर आली आहे.मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ व गाजलेले अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.मृ’त्यु’समयी त्यांचे वय 93 वर्षांचे होते.ते धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत होते व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.यासंदर्भातील अधिकृत माहिती त्यांचे कुटुंबीय व मुलगा अजिंक्य देव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

रमेश देव गेली अनेक दशके मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत होते.रमेश देव हे त्यांच्या काळातील एक आघाडीचे व यशस्वी अभिनेते होते.त्यांचा जन्म 1929 साली कोल्हापूर येथे झाला.मराठी चित्रपटांप्रमाणे  हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये ही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.आरती हा त्यांचा हिंदीमधील पहिला चित्रपट होता तर आंधळा मागतो एक डोळा हा त्यांचा मराठीतील पहिला चित्रपट होता.अभिनयाप्रमाणेच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपली छाप सोडली.

आपल्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीमध्ये रमेश देव यांनी 285 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये व 190 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या बरोबरीनेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये सुद्धा कामं केली आहेत.जाहिरातीच्या निर्मितीमध्ये सुद्धा ते सक्रिय होते.अभिनय आणि दिग्दर्शन हे जणू काही त्यांचा श्वास होते व म्हणूनच अखेरपर्यंत त्यांनी अनेक माहितीपट व लघुपटांची सुद्धा निर्मिती केली.

2013 साली त्यांना पुणे अंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.रमेश देव यांनी आपल्या अभिनय कारकिर्दी मध्ये खलनायक,नायक,सहाय्यक अभिनेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत.आनंद या चित्रपटातील रमेश देव यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.वैयक्तिक आयुष्यामध्ये रमेश देव यांना साथ देणार्‍या त्यांच्या अर्धांगिनी सीमा देव या सुद्धा एक यशस्वी अभिनेत्री होत्या व गेली साठ वर्षे या दोघांनी एकमेकांना अविरतपणे साथ दिली.रमेश देव यांच्या निधनामुळे निश्चितच बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.