Home » ‘या’ कारणामुळे शाहरुख खान ने मास्क खाली करुन…
News

‘या’ कारणामुळे शाहरुख खान ने मास्क खाली करुन…

६ फेब्रुवारीला भारतातील गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोकाकूल झाला व सर्व स्तरातील लोक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जमले होते.यावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खाननेही दर्शनाच्या वेळी दुवा मागितली व दुवाला दम देण्याच्या पद्धती प्रमाणे त्यांच्या पार्थिवावर हळुवारपणे फूंकर मारली.आता अनेकांनी शाहरुखच्या या कृतीशील प्रश्नचिन्ह उभे केले आहे व यावरून नवीनच वादाला सुरुवात झाली आहे.ही प्रथा काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

लतादीदी या बॉलीवूड मधील सर्व पिढीतील कलाकारांच्या आदर्श  होत्या व प्रत्येकासोबत त्यांचे जवळचे नाते होते.म्हणूनच त्यांच्या जाण्याने जणू काही एखादी कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे दुःख सर्वांना झाले होते.शाहरूखला सुद्धा त्यांच्या जाण्याने अती दुःख झाले होते व तो त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थित होता.

६ फेब्रुवारी रोजी लतादीदींच्या अंत्यदर्शनाला भारताच्या पंतप्रधान,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अन्य मंत्री व बॉलिवुड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.प्रत्येक जण यावेळी गहिवरून गेला होता.अशावेळी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने ही त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांचा या जगातील प्रवास पूर्ण झाल्या मुळे त्यांच्यासाठी त्याचे हात प्रार्थना करायला उंचावले गेले होते.

त्यांच्यासाठी दुआ अदा केल्यानंतर त्याने आपला मास्क हटवला व त्यांच्या पार्थिवावर थोडेसे झुकून हळुवारपणे फुंकर मारली‌. मात्र या कृतीवरून आता खूप मोठा वाद विवाद निर्माण झाला आहे.भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी शाहरुख ची ही कृती फुंकर मारणे नसून शाहरुखने लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचे म्हटले आहे व एका नवीन वादाला तोंड फोडले आहे.

शाहरुखने लताजींसाठी दुआ मागितली त्याबद्दल काहींनी त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी त्याच्यावर टीका केली आहे. नक्की ही दुआ मागण्याची पद्धत काय आहे.इस्लाम धर्मामध्ये जेव्हा कुणासाठीतरी दुआ मागायची असते तेव्हा दोन्ही हात छातीच्या थोडेसे खाली एकत्र आणून परमेश्वराकडे आपल्या इच्छा व मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आर्जव केले जाते.हे हात अशा प्रकारे एकत्र ठेवले जातात जसे काही आपण कोणाकडे काहीतरी दान मागताना असलेली झोळी असते.

अशाप्रकारे जी दुआ मागितली जाते यामध्ये एखाद्याला नोकरी मिळावी म्हणून किंवा तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून किंवा आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते.शाहरुखने लतादीदींच्या आत्म्यास शांती साठी जवळपास बारा सेकंड प्रार्थना केली व यानंतर आपला मास्क काढून त्याने त्यांच्या पार्थिवावर हळुवारपणे फूंकर मारली‌.इस्लाम धर्मातील प्रार्थनांच्या दृष्टीने ही खूपच सर्वसामान्य गोष्ट आहे.

अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रार्थना केल्याचे आपण पाहिलेले आहे.दर्गा किंवा मशिदीमध्ये ही लहान मुलांसाठी एखादी प्रार्थना केली जाते व त्यांचे आई-वडील ही प्रार्थना करून या छोट्या मुलांवर फुंकर मारतात.छोट्या मुलां प्रमाणेच मोठ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारे प्रार्थना केली जाऊ शकते.इस्लाम धर्मातील तज्ञांच्या मते अशाप्रकारे प्रार्थना करणे व यानंतर दम मारणे किंवा फुंकर मारणे हे खूप सर्वसाधारण प्रथा आहे.

एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरावर फुंकर मारणे म्हणजे ज्या  व्यक्तीसाठी आयत वाचली आहे किंवा स्मरण केले आहे तिचा परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही फुंकर मारली जाते.अनेकदा पूर्वीच्या काळी असे म्हटले जाते असे की काही लोक जादू किंवा तंत्र मंत्रांच्या मदतीने फूंकर मारून काही विपरीत गोष्टी करत असत या विपरीत गोष्टींचा परिणाम दूर करण्यासाठी आयत स्मरण करून त्या व्यक्तीच्या शरीरावर फूंकर मारण्याची प्रथा पाळली जाते.

इस्लाम मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आयत असतात.यामध्ये आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी,आत्म्याच्या शांतीसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयत असतात.शाहरुखने सुद्धा लतादीदींचा अशाच प्रकारचे आयात स्मरण करून आयतचा असर त्यांच्या पार्थिवावर व्हावा म्हणून फूंकर मारले असेल असे सांगितले जाते.काहींच्या मते अशाप्रकारे दुआ देणे हे जिवंत व्यक्तींच्या बाबतीत होते मात्र शाहरुख हा सामाजिक स्थान असलेला व्यक्ती आहे व त्यांनी या दृष्टीने ही कृती केली असेल त्यामुळे या कृतीचा संबंध धर्माशी जोडू नये असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुआ अदा केल्यानंतर शाहरुखने पूर्णपणे खाली झुकून लतादीदींच्या पार्थिवाचे हात जोडून दर्शन घेतले व एक प्रदक्षिणा मारली.या वेळी त्याच्या बाजूला त्याची मॅनेजर पूजा ददलानी ही हिंदू पद्धतीने नमस्कार करून त्यांच्यासाठी प्रार्थना करत होती हे चित्रही अनेकांना भारताचे खरे चित्र वाटले.