Home » ब्रेकिंग! राज्यात येत्या रविवार पासून 8 च्या आत घरात!
News

ब्रेकिंग! राज्यात येत्या रविवार पासून 8 च्या आत घरात!

राज्यात वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस चिंता वाढवत आहे. आणि यावरच उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार 28 मार्च 2021 पासून राज्यभर रात्रीची संचारबंदी म्हणजेच कर्फ्यु जाहीर केला आहे. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत आणि पुनर्वसन विभागाने निर्गमित करावेत असेही त्यांनी सांगितले आहे.

लॉकडाउन लावायची इच्छा नसताना वाढते रुग्ण संख्या लक्षात घेता हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. येत्या काळात देखील जनतेने कोविड चे नियम पाळले नाहीत, तर मात्र निर्बंध आणखी सक्तीचे करण्याची सूचना देखील त्यांनी दिली.

शासनाने निर्गमित केलेले आदेश जनता पाळते कि नाही यावर प्रशासनातील लोकांनी लक्ष ठेवावे आणि अंमलबजावणी करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले. राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे त्याचबरोबर देशातही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आपली परिस्थिती ब्रिटन सारख्या देशात प्रमाणे होऊ नये असे वाटत असेल तर जनतेने परिस्थिती लक्षात घेऊन आणि संयमाने वागणे गरजेचे आहे, नाहीतर नाईलाजास्तव आणखी निर्बंध सक्तीचे करून अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे ते बोलले.

मॉल्स, हॉटेल्स, बार्स या सर्व ठिकाणी सांगितलेले नियम पाळले गेले नाहीत तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. रात्री आठ नंतर कोणताही मॉल सुरू राहणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेले निर्बंध देखील पाळावे लागणार आहेत. आणि तसे न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशही त्यांनी पारित केले आहेत.

लसीकरणाचा वेग वाढवायची गरज आहे. त्याच बरोबर जनतेने देखील काही गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थित वागणे गरजेचे आहे. कारण, आपण आरोग्य सुविधा जरी वाढवल्या तरी डॉक्टर्स आणि नर्सेस ची संख्या त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वडबट्या रुग्ण संख्येबरोबर वाढवू शकत नाही आणि हे वास्तव असल्याचेही ते बोलले.