Home » भांडुपच्या रुग्णालयातील अग्नितांडवात 10 रुग्णांत असणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या होरपळून झालेल्या मृत्यूनंतर, ‘हा’ प्रश्न अद्यापही कायम!
News

भांडुपच्या रुग्णालयातील अग्नितांडवात 10 रुग्णांत असणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या होरपळून झालेल्या मृत्यूनंतर, ‘हा’ प्रश्न अद्यापही कायम!

मुंबईमध्ये भांडुप येथील ड्रीम मॉल मध्ये रात्री 12 वाजता अचानक आग लागली. आग कशी लागली? आणि पहिल्या मजल्यावर असलेली आग कोरोना चे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मजल्यावर कशी पोहोचली? अशा अनेक शंका आता उपस्थित होत आहेत.

ड्रीम मॉल मध्ये असलेले सनराइज् हॉस्पिटल आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला झालेले दोन मृत्यू हे आगीमुळे झालेच नाही. ते कोविड उपचारादरम्यान झाले आहेत. अग्निशमन दल बचाव कार्य करत असताना 61 जणांना त्यांनी बाहेर काढलं. मात्र, 4 जणांचा अद्यापही शोध सुरू आहे.

यामध्ये वरचेवर मृतांचा आकडा वाढत गेला, आणि काही वेळापूर्वी हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा यात समावेश आहे. बचाव कार्य झाल्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी होणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, जेव्हा महापौर किशोरी पेडणेकर तिथे पोहोचल्या. त्यावेळी मात्र, त्यांनी बचाव कार्य लवकरात लवकर आटपून या मॉल मध्ये कोरोना वर उपचार करणारे किंबहुना हॉस्पिटल कसे झाले याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मॉल मध्ये हॉस्पिटल उभेच कसे राहिले याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

या मध्ये झालेले मृत्यू, कोरोना चे उपचार घेण्यासाठी मॉलमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये लोक कशी गेली, आणि मुळात मॉलमध्ये हॉस्पिटल उभेच कसे राहिले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याची उत्तरे कदाचित काही काळात आपल्याला कळतील. मात्र, कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत असणारा हलगर्जीपणा, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना परिस्थितीमुळे लागणारा लॉकडाऊन, आणि कोरोनाग्रस्त उपचार घेतात त्या जागेला लागणारी आग, आणि त्यांची सुरक्षितता याबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बीएमसी ने आधीच या मॉलला फायर मॅनेजमेंट सिस्टीम व्यवस्थित नसल्याच्या कारणाने नोटीस बजावल्याचे वृत्त नुकतेच एका प्रथितयश वाहिनीने दाखवले आहे. मग जर नोटीस गेलेली आहे, तर या मॉलमध्ये हॉस्पिटल आहे याचा थांगपत्ता बीएमसी प्रशासनाला नव्हता का? आणि नसेल तर का नव्हता? 76 रुग्णांमधील समाविष्ट कोरोनाग्रस्तांच्या नोंदी कुठे होत्या मग? आणि हॉस्पिटल असण्यावर शंका महापौर उपस्थित करतात यावरही आश्चर्य व्यक्त व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.