Home » खारीक आणि खजूरचे सेवन केल्यामुळे होतात हे फायदे
News

खारीक आणि खजूरचे सेवन केल्यामुळे होतात हे फायदे

उत्तम आरोग्य व बळकट हाडे आणि स्नायूंसाठी खजूर आणि खारीक या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. खजूर आणि खारीक यांच्यामधील गुणधर्म आणि प्रवृत्ती सामान मानली जाते.खारीक ही खजूर वाळवून बनवली जाते. खजूर मऊ असते तर खारीक थोडीशी टणक असते.खजूर मध्ये खारीक च्या तुलनेत कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खजुरचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो तर मांस पेशींना व स्नायूंना बळकटी आणण्यासाठी जास्त कॅलरीज असलेल्या खारकेचे सेवन करण्यास सांगितले जाते.आज आपण या  लेखामध्ये खारीक आणि खजूर या दोहोंमध्ये काय फरक आहे हे जाणून घेणार आहोत तसेच खारीक आणि खजूर चे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

1) खारकेची निर्मिती खजूर वाळवून होत असली तरीही या दोन्हींच्या गुणधर्मांमध्ये काहीसा फरक दिसून येतो. खजूर मऊ तर खारीक कडक आणि टणक असते.खारीक हे खजूर वाळवून बनवले असल्यामुळे दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता असते तर खजूर ही हवाबंद डब्यात भरून ठेवली असता आठ महिने व रेफ्रिजरेटर मध्ये ठेवली असता साधारण वर्षभर टिकवली जाऊ शकते. खारीक यापेक्षाही जास्त काळ टिकवता येऊ शकते. खजूर मध्ये कॅल्शियम, विटामिन सी यांच्या सोबतच लोह सुद्धा आढळून येते तर खारीक मध्ये कर्बोदके कमी प्रमाणात असतात मात्र फायबर खूप जास्त प्रमाणात असते.याव्यतिरिक्त खारिकमध्ये खजूर पेक्षा सुद्धा अधिक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते त्यामुळे कॅल्शियमचा समृद्ध स्त्रोत असे खारिकला म्हटले जाते.

2) खजूर मध्ये निसर्गत: थंड गुणधर्म असतात त्यामुळे उन्हाळ्यात खजुरचे सेवन अवश्य करावे असे सांगितले जाते. त्यामुळे शरीरातील अंतर्गत दाह कमी होतो, छातीत होणारी जळजळ थांबते.
3) खजूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंतूजन्य पदार्थ असतात. तंतुजन्य पदार्थ पचनास सहायक असतात. खजूर मधील तंतुमय पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ असतात.त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका मिळते. अपचन, बद्धकोष्ठता आणि वायूपासून सुटका मिळवण्यासाठी रात्रभर पाण्यामध्ये खजूर भिजवून ठेवावी व सकाळी त्याचे सेवन करावे त्यामुळे अधिक प्रभावी पणे उपचार होतात.

4) खोकला, कफ यांसारख्या आजारांवर उपचार म्हणून रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी खजूर आणि दुधाचे सेवन करण्याचा सल्ला खूप पूर्वीपासून दिला जातो‌.त्या व्यतिरिक्त दुधामध्ये थोडीशी काळीमिरी पावडर आणि वेलची सोबत खजूर मिसळून त्याचे सेवन केले असता सर्दी पासूनही आराम मिळतो.
5) वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असणारा व्यक्तींकडून डायटचा अवलंब केला जातो. यामध्ये खुपदा असा एक समज करून घेतला जातो की सुक्या मेव्याचे सेवन केले असता वजन वाढते. मात्र खजूर मुळे वजन वाढत नाही कारण खजूर मध्ये खूप कमी प्रमाणात फ्याट असतात त्यामुळे अतिरिक्त कॅलरीच्या शिरकावास प्रतिबंध केला जातो आणि कोलेस्टेरॉल निर्मिती रोखली जाते.

6) कोलेस्टेरॉलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोह असते. लोहामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीतपणे चालते .पुरेसे लोह मिळाल्याने डोक्याला रक्त प्रवाह सुरळीत पणे केला जातो. केसांच्या मुळांपर्यंत रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे केसांच्या वाढीसही चालना मिळते व डोके शांत राहते.

7) खजूर मध्ये पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणात असते आणि सोडियम हे नाममात्र असते. यामुळे कोलेस्टेरॉलच्या वाढीस आळा घातला जातो ज्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्यापासून बचाव होतो. हृदयाचे कार्य निरोगी पद्धतीने  चालण्यासाठी साहाय्य मिळते.

8) खजूर मध्ये मुबलक प्रमाणात लोहाचा साठा असतो यामुळे शरीराची लोहाची गरज भागवण्यासाठी नियमितपणे खजूरचे सेवन करावे. भारतामधील बहुतांशी स्त्रिया आणि मुलींमध्ये लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनिमया  या आजारापासून बचाव करण्यासाठी नियमितपणे खजुरीचे सेवन करावे.

9) खजूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व आणि ब जीवनसत्व असते आणि त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
10) खारकेला वाळवलेली खजूर असे म्हटले जाते. खारीक मध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. खारीक मध्ये जीवनसत्व क, जीवनसत्व ब६, जीवनसत्त्व ब१ हे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

11) खारीक मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते आणि सोडियम हे नगण्य प्रमाणात असते.चरबीचे प्रमाण खूपच कमी असते व कोलेस्टेरॉल सुद्धा कमी असते त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत मिळते. ह्रुद्याचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्याचे संवर्धन करण्यासाठी खजूरचे सेवन अवश्य करावे.

12) खारीकमध्ये गलूकोज आणि फ्रुक्टोज खुप मोठ्या प्रमाणात असते आणि यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे आणि संवर्धनाचे कार्य पार पाडले जाते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खारकेचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.

13) स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि मांसपेशींना बळकट बनवण्यासाठी खारीकचे सेवन करावे असे सांगितले जाते‌ विशेषतः गर्भवती स्त्रियांना गर्भाशयचे स्नायू मजबूत बनण्यासाठी खारकेचे सेवन बनवायचे सल्ला दिला जातो. याचा उपयोग प्रसुतीच्या वेळी सहजपणे प्रसववेदना सहन करण्यासाठी होतो.