Home » कोरोनाने मोडले कंबरडे, आता महागाई घेणार 1 एप्रिलपासून जीव!
News

कोरोनाने मोडले कंबरडे, आता महागाई घेणार 1 एप्रिलपासून जीव!

कोरोनाने आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाचे कंबरडे मोडलेले असताना, पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल नंतर काही वस्तू 1 एप्रिल पासून महागणार असल्याची बातमी समोर येत आहे. आपण जाणून घेऊया की, कोणत्या आहेत त्या वस्तू आणि किती होणार आहे त्याची दरवाढ!

  1. दूध ही अत्यावश्यक गोष्ट आहे. प्रत्येक घरात दुधाशिवाय सकाळ सुरू होत नाही, लहान मोठ्या प्रत्येकच माणसाला दूध, चहा किंवा इतर गोष्टी साठी दुधाची गरज लागते. हीच अत्यावश्यक गोष्ट 1 एप्रिल पासून 49 रुपये प्रति लिटर प्रमाणे खरेदी करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी दुधाला 55 रुपये भाव मिळावा म्हणून मागणी लावून धरली होती. मात्र, व्यापाऱ्यांनी 3 रुपये दरवाढ करत 49 रुपयांप्रमाणे दूध मिळणार असल्याचे घोषित केले आहे.
  2. आग्रा लखनऊ द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रवास भाडे महागणार आहे कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 25 रुपये ही दरवाढ होणार आहे.
  3. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मिळत आहे. घरगुती उड्डाणे 5 टक्क्यांनी महागणार असून विमान वाहतूक सुरक्षा फी दोनशे रुपये होणार आहे, ती सध्या 160 रुपये आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पदांसाठी वाहतूक सुरक्षा फी ही 5.2 डॉलर वरून 12 डॉलरपर्यंत महागणार आहे.
  4. टीव्ही, एसी, फ्रीज, या वस्तू देखील आता महागणार असून 2 ते 3 हजारांनी टीव्ही महागणार आहे. तर चार ते सहा टक्क्यांनी एसी, फ्रीज, कूलर सारख्या वस्तू 1 एप्रिलपासून मागणार आहेत.