Home » आईवडील गाढ झोपेत होते,बाळ गुदमरत होते! आईवडिलांचा हलगर्जीपणा नवजात बालकाच्या जीवावर बेतला…
News

आईवडील गाढ झोपेत होते,बाळ गुदमरत होते! आईवडिलांचा हलगर्जीपणा नवजात बालकाच्या जीवावर बेतला…

नवजात बाळाला किती आणि कसे जपावे लागते हे सगळ्यांनाच माहीत आहे.लहान बाळाला सांभाळताना एक छोटी चूक देखील महागात पडू शकती. लहान बालकाला काही समजत नसल्याने आईवडिलांना सतत सावध राहून बाळाचा सांभाळ करावा लागतो.वडीलांकडून झालेला थोडासा हलगर्जीपणा बाळाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

ब्रिटनमध्ये कॉर्नवाल या भागात राहणाऱ्या दाम्पत्याला नुकतीच एक मुलगी झाली होती. दवाखान्यातून घरी आल्यावर नवजात मुलीचे सगळ्या घरच्यांनी जोरदार स्वागत केले तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणली आणि त्या सोबतच एक पाळणा देखील आणला.

दररोज नियमितपणे त्या बाळाला स्तनपान झाल्यावर त्या पालण्यामध्ये झोपी घालण्यात येत होते जेव्हा मुलगी रडायची तेव्हा तिचे वडील त्या मुलीला तिच्या आईकडे द्यायचे आईच दूध पिल्यावर मुलगी झोपी जायची तिला पुन्हा पाळण्यात टाकले जायचे.

नियमितपणे असेच सुरू असायचे परंतु एक दिवस या मध्ये खाडा पडला आणि वडिलांची झोप बाळाच्या जीवावर बेतली.नेहमीप्रमाणे दूध पिल्यावत मुलीला पाळण्यात टाकण्याएवजी वडिलांनी तिला त्यांच्याजवलाच ठेवलं आई आणि वडील दोघांना दिवसभर थकल्यामुळे थोड्या वेळातच गाढ झोप लागली झोपेमध्ये वडिलांचा हात मुलीच्या नाकावर पडला त्यामुळे बाळाचा जीव गुदमरून जीव गेला.त्या १८ दिवसाच्या बाळाला स्वतःची सुटका करून घेणे शक्य नव्हते. वडील मात्र गाढ झोपेत होते त्यांना त्यांच्याकडून काय चूक झाली हे कळेपर्यंत खुप उशीर झाला होता.

सकाळी झोपेतून उठल्यावर वडिलांना धक्का बसला बाळ त्यांच्या हाताखाली गुदमरून पडले होते. त्यांनी लगेच बाळाला दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी बाळाला मृ’त घोषित केले या घटनेमुळे आईवडिलांना मोठा धोका बसला या चुकीमुळे मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असे वडिलांनी म्हंटले.एका लहान चुकीमुळे चिमुकल्या मुलीचा2जीव गमवावा लागला.