Home » गावातील तरूणांनी एकत्र येत सुरू केली कोरोना विरुद्ध लढाई, व घालून दिला नवीन आदर्श
News

गावातील तरूणांनी एकत्र येत सुरू केली कोरोना विरुद्ध लढाई, व घालून दिला नवीन आदर्श

संपूर्ण जगामध्ये कोरोनाने गेल्या वर्षभरापासून थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात आला आहे अशी चिन्हे दिसत असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपला तडाखा दिला आहे व या लाटेची तीव्रता अधिक जास्त असल्याचे सिद्ध झाले आहे. यावेळेस गेल्यावर्षी फारसा प्रसार न झालेल्या ग्रामीण भाग आणि विविध वयोगटांतील व्यक्तींना याचा संसर्ग अगदी सहजपणे होत असल्याचे दिसून येत आहे.यावेळी मृत्यु दर वाढल्याचे निष्पन्न झाले आहे.

या सर्व परिस्थितीमध्ये सरकार आपल्या परीने सर्व यंत्रणा कामाला लावून विविध वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचे काम करत आहे‌ पण इतक्या जास्त प्रमाणात वाढत होत असलेल्या कोरोनाला थोपविण्यासाठी ही यंत्रणा अपुरी पडत आहे हे दिसून येत आहे. वेळेत ऑक्सिजन पुरवठा न होणे, ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही ,सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांचा पुरेसा साठा नसणे या सर्व समस्यांना एकजुटीने सामोरे जाण्याची आवश्‍यकता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

गावांमध्ये जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अशा ठिकाणी शासकीय मदत वेळेत पोचण्यास वेळ लागत असल्यामुळे गावकऱ्यांनी एकजूट होण्याची गरज आहे व विशेषत: भारतासारख्या महासत्तेचे भविष्य असलेल्या तरुणांनी अशा काळामध्ये पुढाकार घेत गावासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .अशा काळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर वर सुद्धा  राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचा सुळसुळाट आहे त्याच वेळी गावातील तरुणांनी एकत्र येत गावकऱ्यांच्या सोयीसाठी कोविड सेंटर सुरू करण्याचा आदर्श सुदधा घालून दिल्याचे उदाहरण नुकतेच आढळले आहे. हे कोविड सेंटर सुरू केले आहे औरंगाबाद जिल्ह्यातील दादेगाव हजारे येथील तरूणांनी होय.

डॉक्टरांच्या सल्याने ज्या रुग्णांना विलगीकरनाची आवश्यकता आहे त्याची गैरसोय होऊनये म्हणून गावामध्येच विलगीकर उभारण्यात यावे या दृष्टीने गावातील काही तरुणांनी क्षितिज फौंडेशन सोबत एकत्र येऊन गावांमध्ये शासनाच्या मदतीने विलगीकरन सेंटर उभारण्याचा विचार केला व केवळ विचार करण्यापुरतेच न थांबता या उपक्रमाचा पाठपुरावा करत गावामध्ये कोविड विलगीकर केंद्र सुरूही केले.

या कोविड विलगीकर केंद्रामध्ये ज्या गावक-यांना कोरोनाशी निगडीत लक्षणे जाणवत आहे किंवा ज्या व्यक्ती कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्या आहेत त्यांना विलगीकरणासाठी या कोविड विलगीकर केंद्रामध्ये सर्व सोयी करण्यात आल्या आहे. विठ्ठल हजारे, पूष्पराज हजारे,कृष्णा हजारे, वैभव हजारे,  यांच्या पुढाकाराने गावातील विलगीकर सेंटर तयार करण्यात आले. तरुणांनी गावाची आरोग्यविषयक निकड ओळखून हे विलगीकर केंद्र सुरू केले असले तरी सर्व रुग्णांच्या आरोग्यविषयक सुविधा आणि अन्य काही सुविधांसाठी आर्थिक मदतीची ही या तरुणांना गरज आहे व त्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांनी अवश्य संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

केवळ तरुणच नव्हे तर गावातील काही गावकऱ्यांनी विलगीकर केंद्रामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांना सकाळचा नाश्ता किंवा पाणीपुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे ती निश्चितच सकारात्मक आणि आशादायी बाब आहे. दीपक बाप्पू हजारे, भरत थोटे, अशोक गोरे, गोपाळ कुलट या सर्व गावक-यांनी कोविड केंद्र‌ सुरळीतपणे चालवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली .या आरोग्य विषयक आपत्तीच्या परिस्थितीमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी सर्व हेवेदावे बाजूला ठेवून अन्य गावांनीही हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असे उपक्रम राबवण्याची नितांत गरज आहे.